येथील बुधवार पेठेतील शिवाजी क्लॉथ मार्केट समोर एकाने डॉक्टर महिलेवर कोयत्याने वार केला. तुम्ही वीज कनेक्शन जोडू नका; नाहीतर तुम्हाला जिवंत ठेवत नाही, असे म्हणून संबंधिताने हे कृत्य केले. गुरूवारी सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली असून याप्रकरणी एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!