फरशी खरेदी करण्याकरता बँकेच्या अकाऊंट मोबाइलद्वारे ऑनलाइन नेट बँकिंगद्वारे दोन लाख रुपये पाठवूनही फरशीची ऑर्डर पूर्ण न करता नागठाणे, ता. सातारा येथील एका व्यापाऱ्याची २ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली.
सातारा : फरशी खरेदी करण्याकरता बँकेच्या अकाऊंट मोबाइलद्वारे ऑनलाइन नेट बँकिंगद्वारे दोन लाख रुपये पाठवूनही फरशीची ऑर्डर पूर्ण न करता नागठाणे, ता. सातारा येथील एका व्यापाऱ्याची २ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली.
याप्रकरणी राहुल गिरीशभाई गजेरा, राहणार न्यूपुरी अपार्टमेंट समोर वासना बसस्टॅन्ड, अहमदाबाद याच्या विरोधात बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ९ जानेवारी २०१७ रोजी ३ वाजण्याच्या सुमारास राहुल गिरीशभाई गजेरा याने नागठाणे येथील शेखर राजरतन कांबळे यांचा विश्वास संपादन करून आमच्या कंपनीमार्फत तुम्हाला योग्य दरात फरशी दिली जाईल असे सांगीतले. त्याच दिवशी राहुल गजेरा यांच्या बँक ऑफ इंडिया शाखा, वासना बसस्टँड, औरंगाबाद या बँकेच्या खात्यावर शेखर कांबळे यांनी मोबाइल ऑनलाइन नेट बँकिंगद्वारे २ लाख रुपये पाठवूनही गजेरा याने फरशीची ऑर्डर दिली नसून त्याने आपली फसवणूक केल्याची तक्रार शेखर कांबळे यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.


