maharashtra

इन्स्टाग्रामवरून अल्पवयीन युवतीचा व तिच्या आईचा विनयभंग

सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोचा गुन्हा दाखल

Harassment of a minor girl and her mother on Instagram
इन्स्टाग्रामवर युवतीचे बनावट अकाउंट काढून जवाहर नवोदय विद्यालयातल्या युवकाने अल्पवयीन युवतीचा व तिच्या आईचा पाठलाग करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी त्या युवकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या युवकास अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

सातारा : इन्स्टाग्रामवर युवतीचे बनावट अकाउंट काढून जवाहर नवोदय विद्यालयातल्या युवकाने अल्पवयीन युवतीचा व तिच्या आईचा पाठलाग करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी त्या युवकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या युवकास अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
याबाबत  पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खावली ता. सातारा येथील जवाहर नवोदय विद्यालयात राहणारा विपुल विजय भोंडवे याने बनावट इन्स्टाग्रामचे अकाऊंट काढून एका युवतीशी युवती असल्याचे भासवून चॅटिंग करत होता. अश्लील फोटो, व्हिडीओ टाकून त्या युवतीच्या व तिच्या आईचा पाठलाग करून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन दि.२१ नोव्हेंबर २०२१ ते दि.२० डिसेंबर २०२२ या कालावधीत केले. त्या युवतीच्या आईने सातारा शहर पोलीस ठाण्यात दिल्यानंतर विपुल याच्यावर पोक्सो नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.