सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रविवार दि. २० फेब्रुवारी रोजी येथील राष्ट्रवादी भवनमध्ये सभासद नोंदणी अभियान व नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी दिली.
सातारा : सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रविवार दि. २० फेब्रुवारी रोजी येथील राष्ट्रवादी भवनमध्ये सभासद नोंदणी अभियान व नुकत्याच झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी दिली.
रविवार दि. २० फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता सातारा येथील राष्ट्रवादी भवन येथे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आ. दीपक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील चव्हाण, सत्यजित पाटणकर, प्रभाकर देशमुख, दीपक पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविधसेलचे जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.


