maharashtra

फलटण तालुक्यात चार दारू अड्डयांवर छापे


Raids on four liquor dens in Phaltan taluka
फलटण तालुक्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असणाऱ्या दारू अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी ६ हजार ४२० रुपये किमतीच्या हातभट्टी व देशी-विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.

सातारा : फलटण तालुक्यात चार वेगवेगळ्या ठिकाणी सुरु असणाऱ्या दारू अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी ६ हजार ४२० रुपये किमतीच्या हातभट्टी व देशी-विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी आदर्की खुर्द, ता. फलटण गावच्या हद्दीत हिंगणगाव फाटा येथे एका हॉटेलच्या आडोशाला हिंगणगाव येथील आनंदराव राजाराम ठोंबरे यांच्याकडून १ हजार ४२०, सोमंथळी, ता. फलटण गावच्या हद्दीत लक्ष्मी दूध डेअरी कंपनीच्या आडोशाला तेथीलच विलास तुकाराम अहिवळे याच्याकडून ९००, विडणी (भिमनगर) ता. फलटण गावच्या हद्दीत तेथीलच  नितीन बाळू मोरे याच्याकडून ६०० रुपये किमतीच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. मलठण, ता. फलटण येथील जिंती नाका परिसरात असणाऱ्या कॅनॉलच्या झुडपाच्या आडोशाला तेथीलच रोहित नटराज पवार याच्याकडून ३ हजार ५०० रुपये किमतीची हातभट्टीची ३५ लिटर दारू हस्तगत करण्यात आली.