देगाव, ता. सातारा गावच्या हद्दीत शिवारातून अज्ञात चोरट्याने तिन एचपीची मोटर लंपास केल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
येथील राजवाडा परिसरात असणार्या चौपाटी समोरील शौचालयासमोर पार्किंग केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा शहर परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी एका विधवा महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी चेतन भोसले, वय 28, रा. वनगळ, ता. सातारा (पूर्ण नाव माहीत नाही) याच्या विरोधात शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आली नाही.
करंजे, ता. सातारा येथील चोरी प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला यश आले. त्यांच्याकडुन गुन्ह्यांमध्ये वापरलेल्या टेम्पोसह 2 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
चोरीला गेलेली जमीन शोधून मिळण्यासाठी सातारा येथे अहिर, ता. महाबळेश्वर येथील सपकाळ कुटुंबीयांनी आजपासून आंदोलन सुरू केले आहे. आम्हाला न्याय न मिळाल्यास दि. 14 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण देशात माजी लष्करी अधिकाऱ्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या सातारा तालुक्यातील मिलिटरी अपशिंगे या गावामध्ये रशियन बनावटीचा रणगाडा दाखल झाला आहे. युद्धातील स्मृती जपण्या करता या रणगाड्याला गावात ठेवणार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. यामुळे मिलिटरी अपशिंगे गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
स्वत:च्या नावावर हप्त्याने मोबाईल घेवून देत त्या मोबाईलचे हप्ते न भरल्याचा राग मनात धरुन वाद झाला. या वादातून एकावर चाकूने वार करण्यात आले. ही घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या दरम्यान सोमवारपेठ, सातारा येथे घडली.
खानापूर, ता. वाई येथील दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व किराणा साहित्य चोरून नेल्याची तक्रार भुईंज पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा शहर परिसरात वास्तव्य करणार्या एका युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर सातारा शहर परिसरात एकाने अत्याचार केल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
जाधववाडी, ता. सातारा येथे घरफोडी करून ७१ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमालाची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.