Satara

esahas.com

‘अन्न व औषध’ची अलंकार मिल्क अँण्ड कॅटल फिडसवर धडाकेबाज कारवाई

अन्न व औषध प्रशासन विभागाने औंध येथील अलंकार मिल्क अँण्ड कॅटल फिडस या आस्थापनेवर कारवाई करीत सुमारे 3 लाख 86 हजारांचा माल जप्त केला आहे. याठिकाणचे काही नमुने घेवून ते विश्‍लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत.

esahas.com

मुंबई बँकेला जाणून-बुजून टार्गेट केले जात आहे : प्रवीण दरेकर

विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांची आज (दि.१७) सातारा येथे पत्रकार परिषद झाली. यामध्ये बोलत असताना त्यांनी आघाडी सरकारवर सडकून टीका केली. मी राज्याचा विरोधी पक्ष नेता आहे. राज्यातील उत्तम असणाऱ्या चार ते पाच बँकांपैकी असलेल्या मुंबई बँकेला जाणून-बुजून टार्गेट केले जात आहे. मी राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून जनतेपुढे तुमचे खरे चित्र आणतो आहे, असे प्रवीण दरेकर म्हणाले.

esahas.com

होळीनिमित्त श्री गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

माण तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या गोंदवले याठिकाणी सध्या कोरोना निर्बंध शिथील झाल्यामुळे भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. आज होळी पौर्णिमा व गुरुवार असल्याने मोठ्या प्रमाणात श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधीच्या दर्शनासाठी रांगा लावून शिस्तबद्ध पद्धतीने भाविकांनी दर्शन घेतले. या भाविकांना लापशीचा प्रसाद वाटप करण्यात आला.

esahas.com

दोन लाख रुपये गायब होवूनही पोलिसांत तक्रार नाही

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही तशी नावाजलेली आणि अनेक पुरस्कार प्राप्त असलेली बँक आहे. मात्र, याच बँकेच्या पोवईनाका शाखेत गत आठवड्यात महिला कॅशिअरच्या केबीनमधून 2 लाख रुपये लंपास झाल्याचा प्रकार घडला आहे. त्यानंतर वास्तविक दोन लाख चोरीस गेल्याची वा अपहार झाल्याची तक्रार तरी देणे आवश्‍यक असताना शाखेच्या मॅनेजरने कॅशिअरकडून या रकमेची भरपाई करुन घेतल्याचा प्रकार घडला असून नोकरीच्या भीतीने त्या महिला कॅशिअरने देखील याची वाच्यता बाहेर केलेली नाही.

esahas.com

पिंपोडे बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालयात जमावाकडून तोडफोड

कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक ग्रामीण रुग्णालयाची जमावाने तोडफोड केल्याची घटना मंगळवारी दि.१५ रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली. तसेच जमावाने रुग्णालयाची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. याबाबत रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाठार स्टेशन पोलिस ठाण्यात तक्रार दिलेली आहे.

esahas.com

शंभूतीर्थ स्मारक उभारणीसाठी कराड तालुक्याचा सहभाग घेणार

स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांचे येथील भेदा चौकात भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकस्थळास शंभूतीर्थ असे संबोधण्यात येणार असून देशातील एक भव्य स्मारक उभारण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या स्मारकासाठी शासकीय परवानग्यांसाठी प्रयत्न सुरू आहेत.

esahas.com

पार्थिवाच्या दहनासाठी ‘अग्निकाष्ठ’ सरपण वापरा

मानवी पार्थिवाच्या दहनासाठी कोट्यावधी वृक्षांची कत्तल होते. याला पर्याय म्हणून झाडांचा पडलेला पालापाचोळा, ऊसाच्या चोयट्या, बगॅस आदी. बायोवेस्टमधून ‘अग्निकाष्ठ’ नावाचे सरपण उपलब्ध करण्यात आले आहे. या सरपणामुळे लाकडाची बचत होणार असून पर्यायाने वृक्षतोड थांबून पर्यावरणाचा र्‍हास टळणार आहे. यासाठी मानवी पार्थिवाच्या दहनासाठी ‘अग्निकाष्ठ’ सरपण वापरावे, असे आवाहन अग्निकाष्ठ सरण समितीकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

esahas.com

कण्हेर उजव्या कालव्याच्या दुरुस्ती प्रकरणी जिल्हा भाजपचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सातारा शहरातून जाणाऱ्या कण्हेर उजव्या कॅनॉलची दुरुस्ती करावी किंवा नागरी वस्तीमध्ये पाईपलाईन टाकावी, अशी मागणी भाजपा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी यांनी सातारा जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. या कालव्याची अत्यंत दूरावस्था झाली असून पाणी गळती वाढल्याने ही मागणी करण्यात आली.

esahas.com

घंटागाडीच्या चालकांची कामगार आयुक्तांकडे धाव

सातारा पालिकेच्या घंटा गाड्यांवर काम करणाऱ्या सुमारे 69 घंटागाडी चालकांनी ठेकेदाराने ईपीएफ प्रकरणात फसवणूक केल्याप्रकरणी कामगार आयुक्तांकडे धाव घेतली आहे. ठेकेदाराची तक्रार करणारे लेखी पत्र कामगार आयुक्तांना सादर करण्यात आले असून या प्रकरणी न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे.

esahas.com

वकिलावरील हल्ला प्रकरणी शाहूपुरी पोलिसांकडून दोघांना अटक

शाहूनगर येथील अ‍ॅड. राम खारकर (वय ३८, रा. शाहूनगर) यांच्यावर प्राणघातक हल्ला करुन त्यांच्या वाहनाची तोडफोड केली. यात एक डोळा निकामी करणाऱ्या युवकांच्या टोळीची नावे समोर आली आहेत. त्यापैकी दोघांना शाहूपुरी पोलिसांच्या डीबी पथकाने अटक केली आहे. संशयित सातारा, पुणे, सांगली येथील असल्याचे तपासात समोर येत आहे.