maharashtra

वकिलावरील हल्ला प्रकरणी शाहूपुरी पोलिसांकडून दोघांना अटक


Shahupuri police arrest two in attack on lawyer
शाहूनगर येथील अ‍ॅड. राम खारकर (वय ३८, रा. शाहूनगर) यांच्यावर प्राणघातक हल्ला करुन त्यांच्या वाहनाची तोडफोड केली. यात एक डोळा निकामी करणाऱ्या युवकांच्या टोळीची नावे समोर आली आहेत. त्यापैकी दोघांना शाहूपुरी पोलिसांच्या डीबी पथकाने अटक केली आहे. संशयित सातारा, पुणे, सांगली येथील असल्याचे तपासात समोर येत आहे.

सातारा : शाहूनगर येथील अ‍ॅड. राम खारकर (वय ३८, रा. शाहूनगर) यांच्यावर प्राणघातक हल्ला करुन त्यांच्या वाहनाची तोडफोड केली. यात एक डोळा निकामी करणाऱ्या युवकांच्या टोळीची नावे समोर आली आहेत. त्यापैकी दोघांना शाहूपुरी पोलिसांच्या डीबी पथकाने अटक केली आहे. संशयित सातारा, पुणे, सांगली येथील असल्याचे तपासात समोर येत आहे. दरम्यान, जखमी वकिलाचे बंधू न्यायाधीश असून त्यांच्या भावाचा हाफ मर्डर झाल्याने खळबळ उडाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी, की ही घटना दि. १२ रोजी रात्री १०.३० च्या दरम्यान  घडलेली आहे. तक्रारदार वकील राममोहन खारकर हे एम एच ११ डीके ००१६ या कारमधून घरी निघाले होते. मोनार्क हॉटेलपासून पुढे चढानजीक आल्यानंतर तेथे ५ ते ६ युवक थांबले होते. संबंधितांना ‘रस्त्यावरुन बाजूला व्हा’, असे म्हटल्यानंतर संशयित युवकांनी तक्रारदार यांच्यासोबत वाद घातला व त्यांच्या अंगावर धावून गेले. संशयितांनी हल्ला चढवत कारच्या काचा फोडल्या. यातच त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. उपचारादरम्यान त्यांचा डोळा निकामी झाला आहे.
साताऱ्यात त्याचे तीव्र पडसाद
या घटनेने साताऱ्यात खळबळ उडाली आहे. त्याचे तीव्र पडसाद उमटले. वकील संघटनेने एक दिवस काम बंद आंदोलन करत तात्काळ संशयित आरोपींना अटक करण्याची मागणी केली. गेली चार दिवस सातारा पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत होते, मात्र त्यात यश येत नव्हते. अखेर शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पो.नि. संजय पतंगे, फौजदार नानासाहेब कदम, पोलिस अमित माने, लैलेश फडतरे यांना माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण (डीबी) पथकाने दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.