Satara

esahas.com

सातारा केंद्रीय विद्यालय उभारणीसाठी जागेचा शोध सुरू

सातारा केंद्रीय विद्यालय उभारणीसाठी खा.श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केलेल्या मागणीला व त्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश येत असल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाकडून केंद्रीय विद्यालय उभारणीसाठी जागेचा शोध सुरू असून पर्यायी जागांची पहाणी खा.श्रीनिवास पाटील यांनी गुरूवारी शासकीय अधिकाऱ्यांसोबत केली.

esahas.com

कृष्णा फौंडेशनमध्ये एमबीएच्या प्रवेशासाठी नोंदणी सुरु

आज एमबीए या व्यवस्थापन क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअरच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थी व्यवस्थापन क्षेत्रात आपले करिअर करताना दिसत आहेत. नवीन शैक्षणिक २०२२ साठी ७ एप्रिल ही व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या  शासकीय प्रवेश परीक्षेसाठी नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख आहे. या कालावधीत जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी आपले नाव नोंदणी करावी, असे आवाहन कृष्णा फौंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

esahas.com

किसनवीर कारखाना वाचविण्यासाठी प्रसंगी पॅनेल टाकणार

किसन वीरच्या आर्थिक अडचणी वाढून वाई तालुक्याची सहकार चळवळ धोक्यात आली आहे. पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असणारा हा कारखाना वाचविणे ही येथील शेतकऱ्यांची गरज आहे. हा कारखाना वाचविण्यासाठी समविचारी सहकार तज्ञांना सोबत घेऊन प्रसंगी आगामी निवडणूकीत आम्ही पॅनेल टाकू, अशी घोषणा किसनवीर सहकारी साखर कारखान्यांचे उपाध्यक्ष दिवंगत गजानन बाबर यांचे पुतणे व पिंपरी चिंचवडचे शिवसेना शहर प्रमुख योगेश बाबर यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत केली.

esahas.com

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून लोकप्रतिनिधींचा तमाशा : प्रदीप जाधव

निक निवडणुका जवळ आल्या की, काही लोकप्रतिनिधींना पुसेगावच्या प्रलंबित प्रश्नांची आठवण होते. गावाचे हित, प्रश्न किंवा जबाबदारीचे फारसे सोयरसुतक नसलेले काहीजण वृत्तपत्रांत फोटो झळकण्यापुरताच प्रश्नांना हात घालत आहेत. पण, यामुळे मूळ प्रश्न तडीला न जाता या समस्यांचे गांभीर्य कमी होत आहे. अशा लोकप्रतिनिधींमुळे पुसेगावकरांना वर्षानुवर्षे अनेक महत्त्वाच्या प्रश्नासाठी संघर्ष करावा लागत आहे. ही बाब खूपच चिंतेची झाली असल्याचे मत माजी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप जाधव यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केले.

esahas.com

ललगुन परिसरात गव्यांचा धुमाकूळ

ललगुण, तालुका खटाव या परिसरातील खडपा, कदमांचा माळ या गायरान क्षेत्रात तसेच धमण्या व संबुळ डोंगराच्या मध्यंतरी रानगव्यांनी धुडगूस घातला आहे. शेतीच्या नुकसानी सह पाळीव जनावरे व शेतामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या अंगावर धावून जात असल्याकारणाने पाळीव जनावरांना व शेतकऱ्यांना त्यांचा धोका निर्माण झाला आहे.

esahas.com

पुसेगावचे सुपुत्र, एन्काउंटर स्पेशालिस्ट राम जाधव यांचा राज्यपालांच्या हस्ते राष्ट्रपती पोलीस पदकाने होणार सन्मान

सातारा जिल्ह्यातील पुसेगावचे सुपुत्र असलेले एन्काउंटर स्पेशालिस्ट सहायक पोलीस आयुक्त (निवृत्त) राम जाधव यांना पोलीस दलातील उल्लेखनीय सेवेबद्द्दल येत्या सोमवारी (दि. २१) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक प्रदान करून सन्मान करण्यात येणार आहे. मुंबईतील राजभवनात होणाऱ्या शानदार समारंभात जाधव यांना हे पदक प्रदान करण्यात येणार आहे.

esahas.com

ऋषी कपूर यांची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी रणबीर काय करतोय पाहिलं?

ऋषी कपूर यांची अखेरची इच्छा पूर्ण करण्यासाठी रणबीर काय करतोय पाहिलं? भावना व्यक्त करताना अश्रू अनावर

esahas.com

उन्हाळ्यात करा खरबुजचे सेवन, या लोकांसाठी फायदेशीर

खरबूजमध्ये कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते.

esahas.com

कमिन्स कंपनीतील 1 कोटी 60 लाख रुपयांचा इंजेक्टर चोरीस

सुरवडी, ता. फलटण येथील टाटा कमिन्स कंपनीच्या वेअर हाऊस व असेंम्बली विभागात विविध ठिकाणी ठेवलेले 1 कोटी 60 लाख 57 हजार 35 रुपये किंमतीचे इंधन इंजेक्टर चोरीस गेल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

esahas.com

महिला वसतिगृह गृहपालास 15 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

सेवानिवृत्तीनंतरची पेन्शन मिळवून देण्यासाठी बी.सि. ई.बी.सी. मुलींचे शासकीय वसतिगृह, उत्तर पार्ले ता. कराड येथील गृहपाल वर्ग 3 महिला अधिकारी यांनी तक्रारदार महिलेकडे 20 हजारांची लाच मगितली. त्यानंतर गुरुवार सापळा रचून 15 हजारांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने संबंधित महिला अधिकाऱ्याला रंगेहात पकडले. गुरुवारी 17 रोजी ही कारवाई करण्यात आली.