maharashtra

निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून लोकप्रतिनिधींचा तमाशा : प्रदीप जाधव


People's Representatives' spectacle with election in mind: Pradip Jadhav
निक निवडणुका जवळ आल्या की, काही लोकप्रतिनिधींना पुसेगावच्या प्रलंबित प्रश्नांची आठवण होते. गावाचे हित, प्रश्न किंवा जबाबदारीचे फारसे सोयरसुतक नसलेले काहीजण वृत्तपत्रांत फोटो झळकण्यापुरताच प्रश्नांना हात घालत आहेत. पण, यामुळे मूळ प्रश्न तडीला न जाता या समस्यांचे गांभीर्य कमी होत आहे. अशा लोकप्रतिनिधींमुळे पुसेगावकरांना वर्षानुवर्षे अनेक महत्त्वाच्या प्रश्नासाठी संघर्ष करावा लागत आहे. ही बाब खूपच चिंतेची झाली असल्याचे मत माजी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप जाधव यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केले.

पुसेगाव : स्थानिक निवडणुका जवळ आल्या की, काही लोकप्रतिनिधींना पुसेगावच्या प्रलंबित प्रश्नांची आठवण होते. गावाचे हित, प्रश्न किंवा जबाबदारीचे फारसे सोयरसुतक नसलेले काहीजण वृत्तपत्रांत फोटो झळकण्यापुरताच प्रश्नांना हात घालत आहेत. पण, यामुळे मूळ प्रश्न तडीला न जाता या समस्यांचे गांभीर्य कमी होत आहे. अशा लोकप्रतिनिधींमुळे पुसेगावकरांना वर्षानुवर्षे अनेक महत्त्वाच्या प्रश्नासाठी संघर्ष करावा लागत आहे. ही बाब खूपच चिंतेची झाली असल्याचे मत माजी ग्रामपंचायत सदस्य प्रदीप जाधव यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केले.
त्यांनी निवेदन म्हटले आहे की, गावातील वार्ड क्र.६ मधील दलित वस्तीत जाणारा रस्ता मागील सात-आठ वर्षांपासून बंद आहे. २०१४ साली या रस्त्याबाबत ग्रामसभेत ठराव होऊन देखील तत्कालीन ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी या कामाबाबत उदासीनता दाखवली होती. स्थानिक प्रश्नांकडे राजकारण म्हणून बघणाऱ्या या लोकप्रतीनिधींनी आजपर्यंत गावाला वेठीस धरण्यापलीकडे दुसरे काहीच केले नाही. आत्तासुद्धा देवस्थानच्या निवडणुकीवर डोळा ठेवून हे महाशय या रस्त्याबाबत प्रशासनाशी कोणताही पत्रव्यवहार न करता केवळ प्रसिद्धीसाठी स्टंट करत आहेत. प्रशासनाशी संवाद साधून गावच्या समस्या सोडविण्याऐवजी केवळ हिरोगिरी करत समाजाची दिशाभूल करण्याचा केविलवाणा प्रयत्न यातून दिसून येत आहे.
दलित वस्तीत जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न हा तिथल्या स्थानिक रहिवाश्यांनी स्वयंप्रेरणेने चालवला आहे. त्यांनी निवडलेला मार्ग न्यायाचा आहे. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आणि लोकसहभागातून आम्ही प्रशासनाशी पत्रव्यवहार केला आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन देखील अनुकूल आहे. त्यामुळे न्यायिक मार्गाने लवकरच रस्ता खुला होईल. विनाकारण या विधिवत मार्गाला वेगळे स्वरूप देऊन हा प्रश्न चिघळविण्याची गरज नाही.  खरतर प्रशासनाशी समन्वय ठेवून काम करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. मात्र, हे महाशय रस्ता रोकोची भाषा करुन आपलेच हासे करुन घेण्याचा प्रकार करत असल्याची खंत जाधव यांनी व्यक्त केली.