ललगुण, तालुका खटाव या परिसरातील खडपा, कदमांचा माळ या गायरान क्षेत्रात तसेच धमण्या व संबुळ डोंगराच्या मध्यंतरी रानगव्यांनी धुडगूस घातला आहे. शेतीच्या नुकसानी सह पाळीव जनावरे व शेतामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या अंगावर धावून जात असल्याकारणाने पाळीव जनावरांना व शेतकऱ्यांना त्यांचा धोका निर्माण झाला आहे.
पुसेगाव : ललगुण, तालुका खटाव या परिसरातील खडपा, कदमांचा माळ या गायरान क्षेत्रात तसेच धमण्या व संबुळ डोंगराच्या मध्यंतरी रानगव्यांनी धुडगूस घातला आहे. शेतीच्या नुकसानी सह पाळीव जनावरे व शेतामध्ये काम करणाऱ्या लोकांच्या अंगावर धावून जात असल्याकारणाने पाळीव जनावरांना व शेतकऱ्यांना त्यांचा धोका निर्माण झाला आहे.
या ठिकाणी त्यांना खायला व पाणी पिण्यासाठी तलाव असल्यामुळे गेले दोन-तीन दिवस त्यांचे वास्तव्य या परिसरात असल्याचे पाणी फाऊंडेशनचे टेक्निकल ट्रेनर सागर घाडगे व शेतकरी बाळू नाळे यांनी ही माहिती दिली असून घाडगे हे या परिसरात नालाबांध डीपी सीसीटी पुनर्बांधणी काम करीत असल्याने त्यांना या रानगव्यांचे दर्शन झाले. परंतु हे रानगवे माणसांच्या अंगावर सुद्धा चाल करून येत असल्याचे त्यांनी सांगितले. यातून जीवितहानी होऊ शकते. म्हणून काही अनर्थ होण्याअगोदरच वन विभागाने याचा बंदोबस्त करण्याची मागणी सागर घाडगे, बाळू नाळे व शेतकऱ्यांनी केली आहे.


