‘अन्न व औषध’ची अलंकार मिल्क अँण्ड कॅटल फिडसवर धडाकेबाज कारवाई
दूध भेसळीतील तब्बल 3 लाख 86 हजारांचा माल जप्त
अन्न व औषध प्रशासन विभागाने औंध येथील अलंकार मिल्क अँण्ड कॅटल फिडस या आस्थापनेवर कारवाई करीत सुमारे 3 लाख 86 हजारांचा माल जप्त केला आहे. याठिकाणचे काही नमुने घेवून ते विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत.
सातारा : अन्न व औषध प्रशासन विभागाने औंध येथील अलंकार मिल्क अँण्ड कॅटल फिडस या आस्थापनेवर कारवाई करीत सुमारे 3 लाख 86 हजारांचा माल जप्त केला आहे. याठिकाणचे काही नमुने घेवून ते विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासन कार्यालयास प्राप्त झालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने जावेद अब्बास आतार, यांच्या मे. अलंकार मिल्क अँण्ड कॅटल फिडस, पाटील गल्ली, बस स्टॅन्ड जवळ, औंध, ता. खटाव, जि. सातारा येथे काल दि.16 रोजी रात्री 11.17 वाजण्याच्या सुमारास तपासणी केली असता याठिकाणी गाय व म्हैसीचे दुध हे विविध ठिकाणाहुन संकलीत करुन तेथे आणत असल्याचे आढळून आले. याठिकाणी जावेद आब्बास आत्तार हे दुध व इतर अपमिश्रकाचे मिश्रण तयार करून संकलित केल्याच्या दुधात मिसळत असल्याचेही आढळून आले. त्यामुळे याठिकाणाहुन हजर व्यक्तींच्या ताब्यातुन गाय-म्हैस दुध व अज्ञात पांढरे द्रावण (अपमिश्रक) चे नमुने घेवून गाय दुध, म्हैस दुधाचा उर्वरीत साठा 702 लिटर किं. रू. 28760 दुधाचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला. तसेच बटर तेल (अपमिश्रक) 18 लिटर एकुण किं. रू. 4860, स्कीम दुध पावडर 499 किलो एकुण किं. रू. 229440 व अज्ञात पांढरे द्रावण (अपमिश्रक) चा उर्वरीत 874 किलो चा साठा जप्त करण्यात आला. असा एकुण 386420 किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
याठिकाणचे नमुने घेवून विश्लेषणासाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्रलविंत आहेत. अहवाल प्राप्त होताच अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
ही कारवाई सहायक आयुक्त श्रीमती अ. अ .भोईटे, अन्न सुरक्षा अधिकारी, श्रीमती अ.ग. गायकवाड, आय. एस. हवालदार, वि.रो. सोनवणे, नमुना सहायक सार्वगोड या पथकाद्वारे करण्यात आलेली आहे. पुढील तपास श्रीमती अ.ग. गायकवाड करीत आहेत.


