अनेक लोकांना वारंवार पेनकिलर घेण्याची जणू सवयच जडलेली असते. छोट्या छोट्या दुखण्याला घाबरुन अनेक जण सरळ मेडिकलवर जात पेनकिलरची मागणी करीत असतात. हे शरीरासाठी धोकेदायक ठरु शकते.
जिल्हा वार्षिक योजनेतून सातारा पोलीस विभागाला मोठ्या प्रमाणात वाहने उपलब्ध करुन देण्यात आली असून यातून प्रत्येक पोलीस स्टेशनला नवीन वाहन मिळणार आहे. यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोठी मदत होईल, असे प्रतिपादन सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
जिहे-कठापूर योजनेसाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 247 कोटी मंजूर केल्याने या योजनेच्या रखडलेल्या कामाला आता गती मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर तसेच माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत प्रत्यक्ष भेट घेवून जिहे-कठापूरचे रखडलेले काम पूर्ण व्हावे, यासाठी निधीची मागणी केली होती. त्यानुसार पंतप्रधान कार्यालयाने 247 कोटींचा निधी जिहे-कठापूर योजनेसाठी मंजूर केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजामध्ये महिला आणि बालकल्याण विषय योजनांना उत्तेजन मिळावे याकरिता पालिका आणि महापालिका यांनी एकूण बजेटच्या पाच टक्के निधी खर्च करावा, असे बंधन घालणारा अध्यादेश नगर विकास विभागाने जाहीर केला आहे. महिलांना सर्व क्षेत्रात सक्षम करण्यासाठी एकूण उत्पन्नापैकी पाच टक्के उत्पन्न स्त्रोत सक्षमीकरणाकरीता वापरला जावा, ही या आदेशामागची मूलभूत कल्पना आहे.
जिल्ह्यातील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यासह आणखी तीन कारखान्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये रयत-अथनी शुगर (कराड), लोकनेते बाळासाहेब देसाई (पाटण) व अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना (शेंद्रे) यांचा समावेश आहे.
गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. महाराष्ट्राच्या नववर्षाची सुरूवात गुढीपाडव्यापासून होते. हिंदू कालदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो. या वर्षी 2 एप्रिल 2022 ला महाराष्ट्रात गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे.
पोलीस सेवेमध्ये कर्तव्यावर असणार्या पोलीस हवालदाराला मारहाण करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणाचा गुन्हा शाबीत झाल्याने सेबेस्टियन स्टेन मुलर (वय 25 राहणार जर्मनी सध्या राहणार सातारा जिल्हा कारागृह), सर्गीस व्हिक्टर मनका (रा. जर्मनी सध्या रा. सातारा जिल्हा कारागृह) या दोघांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तदर्थ न्यायाधीश एन एच जाधव यांनी गुरुवारी हे आदेश दिले.
खोडद, ता. सातारा येथे गट नंबर 218 या क्षेत्रामध्ये जमिनीत खड्डे करण्याच्या वादातून हॉटेल व्यावसायिकाला दहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी अकराच्या दरम्यान घडली. या टोळक्याने आपल्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन हिसकावल्याची फिर्याद राहुल गायकवाड राहणार निसराळे यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.
जुन्या भांडणाच्या रागातून एकाने एकावर कोयत्याने वार केल्याची घटना दिनांक 29 मार्च रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडली. या हल्ल्यामध्ये संतोष पवार हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी राजू वैराग, अजय बागल, रवी सप्टेंबर, प्रथमेश पवार यांच्यावर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मात्र त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
सातारा एसटी स्टँड ते सेव्हन स्टार थेटर यादरम्यान अज्ञाताने दोन नागरिकांची मोबाईल परस्पर लांबवले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यांमध्ये फिर्याद दाखल झाली आहे. चोरट्याने वीस हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल लांबवले आहेत.