खोडद, ता. सातारा येथे गट नंबर 218 या क्षेत्रामध्ये जमिनीत खड्डे करण्याच्या वादातून हॉटेल व्यावसायिकाला दहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी अकराच्या दरम्यान घडली. या टोळक्याने आपल्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन हिसकावल्याची फिर्याद राहुल गायकवाड राहणार निसराळे यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.
सातारा : खोडद, ता. सातारा येथे गट नंबर 218 या क्षेत्रामध्ये जमिनीत खड्डे करण्याच्या वादातून हॉटेल व्यावसायिकाला दहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी अकराच्या दरम्यान घडली. या टोळक्याने आपल्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन हिसकावल्याची फिर्याद राहुल गायकवाड राहणार निसराळे यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, गायकवाड हे सकाळी अकरा वाजता त्यांच्या तीन गुंठे जमिनीमध्ये जेसीबीच्या साह्याने खड्डे करीत असताना संशयित दिलीप पवार, जितेंद्र पवार, सागर पवार, आकाश पवार, दिलीप पवार यांची पत्नी, आकाश माने, प्रदीप जाधव, किरण सुतार व होटेल अष्टविनायक मधील दहा ते पंधरा जण यांनी आरोपीला लाकडी दांडके, लोखंडी पाईप आणि दगडाने बेदम मारहाण केली. तसेच जितेंद्र पवार व आकाश पवार यांनी फिर्यादीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तसेच जेसीबी मशीन ड्रायव्हर भरत कुंभार यांनाही मारहाण करून त्यांच्या जेसीबीची मोडतोड करण्यात आली. यामुळे जेसीबीचे वीस हजार रुपये नुकसान झाले आहे. या मारहाणीमध्ये आपल्या गळ्यातील दोन तोळ्याची पंचावन्न हजार रुपयाच्या किमतीची सोन्याची चेन संबंधितांनी हिसकावल्याची फिर्याद गायकवाड यांनी बोरगाव पोलीस ठाण्यांमध्ये दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. आर. वाघ या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.


