Satara

esahas.com

महाराष्ट्र केसरी च्या आखाड्यातील विजेत्या मल्लांना मिळणार तेहतीस लाखाचे मानधन

तब्बल 61 वर्षांच्या कालखंडानंतर महाराष्ट्र केसरीचा फड साताऱ्याच्या छत्रपती शाहू क्रीडा संकुलामध्ये मंगळवार पासून रंगणार आहे. या तालमी मध्ये तब्बल 900 मल्ल 45 संघामधून एकमेकांशी झुंजणार असून गादी आणि माती विभागातील वजन 57 ते 125 किलो च्या गटांमध्ये विजेत्यांना तब्बल 33 लाख रुपयांचे मानधन दिले जाणार आहे.

esahas.com

चिमण्यांची घटती संख्या पर्यावरणासाठी धोकादायक

20 मार्च हा दिवस जगभरात जागतिक चिमणी दिन (World Sparrow Day) म्हणून साजरा करण्यात येतो. महंमद दिलावर (Mohammad Dilawar) यांनी 2006 मध्ये 'नेचर फॉरेव्हर सोसायटी' नावाची एक संस्था स्थापन केली होती. या संस्थेच्या पुढाकारातून 2010 पासून जागतिक चिमणी दिन साजरा करण्यास सुरुवात झाली.

esahas.com

साताऱ्यात महाराष्ट्र केसरीची तयारी अंतिम टप्प्यात

छ शाहू स्टेडियममध्ये ५ एप्रिल पासून रंगणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. संकुलामध्ये दोन मातीचे व तीन मॅटचे आखाडे वनविण्यात आले असून राज्यभरातील नऊशे मल्ल या आखाडयात मानाच्या गदेसाठी झुंजणार आहेत. कुस्तीपट्टू व प्रशिक्षक अशा एकूण अकराशे जणांसाठी क्रीडा संकुलामध्ये निवास व क्रीडा सुविधा उभारल्या जात आहेत.

esahas.com

पालिकेच्या लेखा विभागाचा मार्च एण्ड रात्री दीड वाजता क्लोजिंग

सातारा पालिकेच्या लेखा विभागाने मार्च एण्डची गडबड रात्री दीड वाजता संपविल्याचे वृत्त आहे. नवीन आणि जुन्या रकमांची वर्गावर्गी आणि जुन्या देण्यांचा तपशील पूर्ण करून मार्च एंडचे क्लोजिग होण्यास कर्मचाऱ्यांना मध्यरात्र उजाडली. पालिकेच्या या मॅरेथॉन कामाचे कौतुक होत आहे असून लेखा विभागाला यंदा 19 कोटीचा महसूल प्राप्त झाला आहे.

esahas.com

महाराष्ट्र राज्य केसरी कुस्ती स्पर्धेच्या अनुषंगाने सातार्‍यातील वाहतुकीत तात्पुरते बदल

दि. 4 एप्रिल ते 9 एप्रिल पर्यंत सातारा शहरातील शाहू स्टेडीयम येथे महाराष्ट्र राज्य केसरी कुस्ती स्पर्धा सन- 2021-2022 होणार असून संपुर्ण महाराष्ट्र राज्यातून स्पर्धक व स्पर्धा पाहण्यासाठी येणारे नागरिक यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने सातारा शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करणे आवश्यक असल्याने जुना आर.टी.ओ. ऑफिस चौक ते भु-विकास बँक चौक व एस.टी.स्टँड इन गेट ते भु-विकास बँक चौक या मार्गावरील वाहतूकीमध्ये खालील प्रमाणे बदल करण्यात आले आहेत.

esahas.com

महाविकास आघाडीच्या दिग्गज मंत्र्यांमध्ये रंगल्या राजकीय कोपरखळ्या

साताऱ्यात शुक्रवारी पोलीस दलाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यातील दोन मंत्री म्हणजे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई आणि सहकारमंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी हजेरी लावली. दोघेही एकाच मंचावर आल्याने दोघांनी एकमेकांना चांगलेचं चिमटे काढले.

esahas.com

भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांची वर्णी

माथाडी कामगार नेते व सातारा जिल्ह्याचे सुपूत्र नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची आज दि. 2 एप्रिल रोजी भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना याबाबतचे पत्र दिले आहे.

esahas.com

पाण्यासाठी महिलांचे फलटण पालिकेसमोर आंदोलन

फलटण नगर परिषद परिसरातील मेटकरीगल्ली भागातील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षापासून पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. नगरपालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने संतप्त महिलांनी ऐन सणासुदीतच नगरपालिकेसमोरच मोकळे हंडे घेऊन धरणे आंदोलन धरले. ऐन सणासुदीत पाण्यासाठी आंदोलन करावे लागल्याने महिलांनी यावेळी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

esahas.com

युवतीचा विनयभंग करून मोबाईल हिसकावून पळून गेलेल्या चोरट्यास अटक

सातारा शहरातील वाय.सी. कॉलेज ते पोवई नाका जाणार्‍या रस्त्यावर एका युवतीचा विनयभंग करुन तिचा मोबाईल हिसकावून पळून गेलेल्या युवकाच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. ही कारवाई शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने पुण्यात जावून केली असून संबंधित युवकास अटक करण्यात आली आहे.

esahas.com

‘थप्पड की गुंज’चे परिणाम! अखेर अभिनेता विल स्मिथचा ॲकडमीचा राजीनामा

जेडा पिंकेट स्मिथची खिल्ली उडवल्यानंतर काहीच वेळात 'किंग रिचर्ड' मधील आपल्या भूमिकेसाठी विल स्मिथला बेस्ट ॲक्टरचा अवॉर्ड जाहीर झाला. याचदरम्यान मंचावर जात स्मिथने ख्रिस रॉकला कानशिलात लगावली.