Satara

esahas.com

मुलाने केली वडिलांना मारहाण

खर्चासाठी 500 रुपये मागितल्यानंतर त्यास नकार दिल्याच्या कारणातून चिडून जावून लोखंडी स्टूल डोक्यात घालून मारहाण केल्याप्रकरणी संदीप सुरेश पावशे याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

हक्कपत्राच्या कारणातून आईला मारहाण

हक्कपत्राच्या कारणातून आईला मारहाण केल्याप्रकरणी जयेश प्रवीणकुमार दवे (रा. शुक्रवार पेठ) याच्याविरुध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

कॅफे च्या तोडफोड प्रकरणातील संशयित युवक ताब्यात

पोवई नाक्यावरील कॅफे ची तोडफोड करून मद्यधुंद अवस्थेत युवतीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेने आज ताब्यात करून सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. राहुल मस्के (वय 23, राहणार गोडोली) असे त्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणातील अन्य तीन संशयित आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

esahas.com

भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांच्यासह पाच जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा

माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांच्यासह पाच जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. मयत माणसाला जिवंत दाखवून जमिनीचा दस्तऐवज केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे, अशी माहिती दहिवडीचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख यांनी दिली आहे.

esahas.com

शाहुनगरी झाली भीममय

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या साताऱ्यात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्या भीमाई भूमीत कोरोनानंतर दोन वर्षानंतर मोठय़ा उत्साहामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाला अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांनी अलोट गर्दी केली होती.

esahas.com

कपूर कुटुंबांकडून आलिया भट्टचं स्वागत, करीनासह आदर, रिद्धिमाच्या पोस्ट चर्चेत

आलिया भट्ट आता कपूर कुटुंबाची सून झाली आहे. कपूर घराण्यात तिचे खास पद्धतीने स्वागत करण्यात आले आहे. बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक जोडी म्हणून रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टला (Alia Bhatt) ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. आज अखेर दोघे लग्नबंधनात अडकले आहेत. आलियाने नुकतेच लग्नसोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आलिया भट्ट आता कपूर घराण्याची सून झाली आहे. करीना कपूरपासून ते आदर जैनपर्यंत अनेकांनी आलियासाठी खास पोस्ट शेअर केली आहे

esahas.com

सातारा शहरातील तेरा कॅफे सील

कॅफेच्या नावाखाली शाळा, महाविद्यालयीन तरुण-तरुणी यांना प्रायव्हसी उपलब्ध करून देणाऱ्या सातारा शहरातील १३ कॅफे सातारा नगरपालिकेने सील केले.

esahas.com

बसमधून अडीच लाख रुपये किमतीचे दागिने चोरीस

दहिवडी ते सातारा जाणाऱ्या बसमधून अज्ञात चोरट्यांनी एका महिलेचे अडीच लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची तक्रार कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

लोणंद येथून दुचाकीची चोरी

लोणंद, ता. खंडाळा गावच्या हद्दीतून अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार लोणंद पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

रस्ता अडवल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा

येथील राधिका रोडवर आंबाजनी बंगला येथे रस्ता आडवला प्रकरणी तीन जणांवर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.