maharashtra

सातारा शहरातील तेरा कॅफे सील

सातारा नगरपालिकेची कारवाई

Thirteen cafe seals in Satara city
कॅफेच्या नावाखाली शाळा, महाविद्यालयीन तरुण-तरुणी यांना प्रायव्हसी उपलब्ध करून देणाऱ्या सातारा शहरातील १३ कॅफे सातारा नगरपालिकेने सील केले.

सातारा : कॅफेच्या नावाखाली शाळा, महाविद्यालयीन तरुण-तरुणी यांना प्रायव्हसी उपलब्ध करून देणाऱ्या सातारा शहरातील १३ कॅफे सातारा नगरपालिकेने सील केले.
याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यातून दिलेली माहिती अशी, कॅफेच्या नावाखाली शाळा, महाविद्यालयीन तरुण तरुणी यांना प्रायव्हसी उपलब्ध करून दिली जात असल्याच्या तक्रारी पोलिस ठाण्याला प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने कॅफे चालकांची बैठक घेऊन त्यांना कडक शब्दात समज दिली होती. नगरपालिकेने ही त्यांना यापूर्वीच नोटिसा बजावल्या होत्या. मात्र कॅफे चालकांनी  सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे दि. १२ व दि. १३  एप्रिल रोजी सातारा नगरपालिकेच्या वतीने पॅरेडाइज्, सातारा बसस्थानक आगर परिसर, स्वीट कपल, सेवन स्टार बिल्डिंग, लव्ह अँड लाटे, सेव्हन स्टार बिल्डिंग, विराज, गुरु शिल्प शाळा परिसर, बॉम्बे रेस्टॉरंट चौक सातारा, रेड रोज, गोडोली नाका, सातारा, कयुपीड, ईस्ट-वेस्ट, व्हॅलेंटाईन, ब्लॅक इन,  सदरबझार, द हिडन, धनगरवाडी, ता. सातारा, फ्रेंड्स फॉर ऐव्हर, सातारा बसस्थानक आगार परिसर, हार्टबीट, विसावा नाका, सातारा, फ्रेंड्स, राजलक्ष्मी टॉकीज जवळ, सातारा हे १३ कॅफे सील करण्यात आले. या कारवाईत सातारा नगरपालिकेचे सतीश साखरे, श्रीकांत गोडसे, प्रशांत निकम, प्रकाश शिर्के यांनी भाग घेतला. त्यांना सातारा शहर पोलिस ठाण्याचे राहुल खाडे, विकास शिंदे यांनी मदत केली.