दहिवडी ते सातारा जाणाऱ्या बसमधून अज्ञात चोरट्यांनी एका महिलेचे अडीच लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची तक्रार कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : दहिवडी ते सातारा जाणाऱ्या बसमधून अज्ञात चोरट्यांनी एका महिलेचे अडीच लाख रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची तक्रार कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ११ एप्रिल रोजी १'ते ३ वाजण्याच्या सुमारास दहिवडी सातारा जाणाऱ्या बस मधून दिपाली दिपक सावंत, वय ३५, रा. आवळेमाथा, लिंबू, ता. सातारा ही महिला प्रवास करीत असताना अज्ञात चोरट्याने तिच्या पर्समधील सव्वा लाख रुपये किमतीचे अडीच तोळे वजनाचा सोन्याचा राणीहार आणि सव्वा लाख रुपये किमतीचा अडीच तोळ्याचा सोन्याचा नेकलेस चोरून नेल्याची तक्रार कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. पोलिसांनी अज्ञात घरट्यावर चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.


