maharashtra

मुलाने केली वडिलांना मारहाण


The son beats the father
खर्चासाठी 500 रुपये मागितल्यानंतर त्यास नकार दिल्याच्या कारणातून चिडून जावून लोखंडी स्टूल डोक्यात घालून मारहाण केल्याप्रकरणी संदीप सुरेश पावशे याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : खर्चासाठी 500 रुपये मागितल्यानंतर त्यास नकार दिल्याच्या कारणातून चिडून जावून लोखंडी स्टूल डोक्यात घालून मारहाण केल्याप्रकरणी संदीप सुरेश पावशे याच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी सुरेश मारुती पावशे (दोघे रा.व्यंकटपुरा पेठ, सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. मारहाण केल्यानंतर तक्रारदार यांनी बचावासाठी आरडाओरडा केल्यानंतर संशयिताने पळून जात जीवंत सोडणार नसल्याची धमकी दिली आहे. दरम्यान, तक्रारदार हे वडील असून मुला विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.