maharashtra

मोबाईलची चोरी


Mobile theft
शाहूनगर येथे अज्ञाताने किराणा दुकानातून मोबाईल चोरुन नेला असून चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : शाहूनगर येथे अज्ञाताने किराणा दुकानातून मोबाईल चोरुन नेला असून चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नवनाथ चंद्रकांत गडदे (वय 41, रा. शाहूनगर) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 13 रोजी घडली आहे. तक्रारदार यांचे किराणा दुकान असून चोरट्याने त्यांचा मोबाईल चोरला. मोबाईल सापडत नसल्याने तक्रारदार यांनी सर्वत्र शोधले. अखेर त्यांच्या सीसीटीव्हीची पाहणी केली असता चोरटा मोबाईल चोरत असल्याचे दिसून आले. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांना अद्याप संशयित सापडलेला नाही.