maharashtra

कॅफे च्या तोडफोड प्रकरणातील संशयित युवक ताब्यात

अन्य तीन युवकांचा सातारा पोलिसांकडून शोध सुरू

Youth arrested in cafe vandalism case
पोवई नाक्यावरील कॅफे ची तोडफोड करून मद्यधुंद अवस्थेत युवतीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेने आज ताब्यात करून सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. राहुल मस्के (वय 23, राहणार गोडोली) असे त्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणातील अन्य तीन संशयित आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

सातारा : पोवई नाक्यावरील कॅफे ची तोडफोड करून मद्यधुंद अवस्थेत युवतीचा विनयभंग करणाऱ्या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेने आज ताब्यात करून सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. राहुल मस्के (वय 23, राहणार गोडोली) असे त्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणातील अन्य तीन संशयित आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
दोन दिवसापूर्वी सातारा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या पोवई नाका परिसरातील एक कॅफे संबंधित युवतीने भाडेतत्त्वावर चालविण्यास घेतला होता. या सायबर कॅफे मध्ये मस्के आणि त्याचे तीन साथीदार येऊन मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा घालू लागले. संबंधित युवतीने त्या चौघांना अटकाव केला असता संबंधितांनी तिच्याबरोबर गैरवर्तन करून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. या युवतीला उशीने तोंड दाबून मारण्याचा सुद्धा प्रयत्न झाल्याने संबंधित युवती प्रचंड घाबरली होती. प्रसंगाचा फायदा घेऊन त्या युवकाने तेथून पळ काढला.
मंगळवारी रात्री त्या युवतीच्या फिर्यादीवरून फिर्याद दाखल झाल्यानंतर सातारा शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांनी युद्धपातळीवर मोहीम राबवली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांना याचा उगम मधील मुख्य संशयित हा गोडोली परिसरात असल्याची पक्की माहिती मिळाली होती. धुमाळ यांनी ठाणे गुन्हे शाखेचे पथक संबंधित परिसरात पाठवून त्या युवकाला ताब्यात घेतले. राहुल मस्के वय 23 राहणार गोडोली असे त्याचे नाव आहे संबंधित युवकाला सातारा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. अन्य तीन संशयितांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
सातारा शहरातील विनापरवाना कॅफेवर सातारा शहर व सातारा नगरपालिका यांनी संयुक्तपणे कारवाई करीत 15 जणांना आर्थिक दंड ठोठावला आहे. सातारा शहरातील कॅफे सध्या वादग्रस्त प्रश्न ठरला आहे. आवश्यक परवानग्या न घेता चालणारे कॅफे म्हणजे युगुलांना एकांतात बसण्यासाठी हक्काचे ठिकाण बनले आहे. त्यामुळेच साताऱ्यातील एका युवतीवर कठीण प्रसंग गुदरला होता. त्यामुळे सातारा शहर पोलिसांनी असे कॅफे कारवाईच्या रडारवर घेतले आहेत. पोलिसांकडून अशा कॅफेंची शोध मोहीम यापुढेही राबवली जाणार असल्याचे सातारा शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सांगितले.