Satara

esahas.com

वाई तालुक्यातून दोन युवती बेपत्ता

वाई तालुक्यातून दोन युवती बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com

कला व वाणिज्य महाविद्यालयात राजश्री शाहू महाराज स्मृती शताब्दी कार्यक्रम संपन्न

पुसेगाव येथील रयत शिक्षण संस्थेचे, कला व वाणिज्य महाविद्यालयात" राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी "निमित्त कार्यक्रम आयोजित केला होता.

esahas.com

पुसेगाव सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी संतोष जाधव, तर उपाध्यक्षपदी विजय जाधव बिनविरोध

येथील पुसेगाव सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी संतोष जगन्नाथ जाधव, तर उपाध्यक्षपदी विजय शिवाजी जाधव यांची बिनविरोध निवड झाली.

esahas.com

आमदार जयकुमार गोरे यांचा जामीन अर्ज फेटाळला; पोलिसांकडून अटकेची टांगती तलवार

आमदार जयकुमार गोरे यांनी वडूज येथील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावर सुनावणी झाली. यावेळी वडूजचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.व्ही. हुद्दार यांनी सरकारी पक्ष व बचाव पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर त्यांनी जयकुमार गोरे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. अटकपुर्व जामीन फेटाळल्यामुळे जयकुमार गोरे यांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

esahas.com

सातारा जिल्हा बँकेकडून व्याजदरांमध्ये तीन टक्के कपात

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी बँकेच्या वतीने सेवा सोसायटी व व्यक्तिगत कर्ज वितरणाच्या व्याजदरांमध्ये एक ते तीन टक्के कपात केल्याची घोषणा केली असल्याची माहिती बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील यांनी पत्रकारांना दिली. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे आणि बँकेचे इतर सर्व संचालक उपस्थित होते.

esahas.com

दारुच्या पैशावरुन बार मालकाला जिवे मारण्याची धमकी

दारु दे नाहीतर तुला आणि तुझ्या बार मालकाला जिवे मारेन’, अशी धमकी दिल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

रेकॉर्डवरील तडीपार गुन्हेगाराला बेदम मारहाण

कराड बसस्थानकानजीक असलेल्या सिटी ईन बार व देशी दारू दूकाना समोर पोलीसांच्या रेकॉर्डवर असलेल्या तडीपार गुन्हेगार यूवकावर पूर्वीच्या वादाच्या रागातून दोघांनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

esahas.com

दारुसाठी खंडणी मागणार्‍या चौघांवर सातार्‍यात गुन्हा

दारु पिऊन गोंधळ करणार्‍या चौघांना गस्तीवर असलेल्या पोलिसांनी हटकले असता, मद्यधुंद अवस्थेत असलेल्या युवकांनी पोलिसाला धक्काबुक्की केली. ही घटना दि. 3 रोजी रात्री पावणे अकराच्या सुमारास सातारा शहरालगत महामार्गावरील हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्हमध्ये घडली. याप्रकरणी पोलिसांनी चारही युवकांना अटक केली आहे.

esahas.com

साखर कारखान्यांच्या आर्थिक लुटीची विभागीय आयुक्तांकडे तक्रार

सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी 2021-22 मध्ये सर्व शासकीय नियम धाब्यावर बसवून गाळप हंगामात गेलेल्या गैर कारभाराविरुद्ध चौकशी करून तात्काळ त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

esahas.com

‘किसनवीर’मध्ये सत्तांतर

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या ‘किसनवीर’ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निकालात आ. मकरंद पाटील यांच्या शेतकरी बचाव पॅनेलने मुसंडी मारली असुन सर्वच्या सर्व 21 जागांवर तब्ब्ल तीन हजारच्या वर मताधिक्याने मोठा व दणदणीत विजयी मिळवत पंधरा वर्षांची मदन भोसले यांची सत्ता उलथवून टाकली आहे.