Satara

esahas.com

संसदीय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न

संसदीय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक समितीचे अध्यक्ष तथा खासदार श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात संपन्न झाली. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग तसेच अन्य मार्गावरील सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम केल्याने आणि नागरिकांच्या सहकार्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत जिल्ह्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण 34 टक्क्यांनी कमी झाले आहे.

esahas.com

अवैध मुरूम उत्खनन करणाऱ्यांवर कडक कारवाईची मनसेची मागणी

चरेगाव, ता.कराड हद्दीदरम्यान असलेल्या सुकाई देवी मंदिरा जवळील परिसरात अवैधरित्या करण्यात आलेल्या मुरूम उत्खननाशी संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी लेखी निवेदनाद्वारे प्रांताधिकारी यांच्याकडे केली आहे.

esahas.com

दिगंबर आगवणे यांची भाजपमधून हकालपट्टी

फलटण तालुक्यातील दिगंबर आगवणे हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात कायम भूमिका घेत असल्याच्या कारणाने व पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळींच्या वर खोटेनाटे आरोप करत असल्याकारणाने जिल्हा अध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या आदेशानुसार त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

esahas.com

व्हिडीओ कॉल केल्यानंतर एकाची 1 लाख 80 हजारांची फसवणूक

व्हिडीओ कॉल केल्यानंतर ते रेकॉर्ड करुन शाहूपुरीतील एकाची 1 लाख 80 हजार 440 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 19 जून 2022 रोजी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

esahas.com

बंडखोर आमदारांना शिवसेनेचा कडक इशारा

विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन गुजरातला गेले. तेथून ते गुवाहाटी येथे गेले. त्यांच्यासोबत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हेही आहेत.

esahas.com

महाविकास आघाडीचे पतन यात आश्चर्य नाही

जर नागरिकांना आणि त्यांच्या कामांना वेळ दिला जात नसेल तर अंर्तगत खदखद वाढणारच. या मतभेदांची कुणकूण कानावर होतीच. राज्यातील महाविकास आघाडीचे पतन झाले, यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही, अशी थेट प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिल्लीवरून दिली आहे.

esahas.com

बुधवार पेठेतील सराईत गुन्हेगारावर एमपीडीए ची कारवाई

सातारा शहरांमध्ये वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये दहशत माजविणाऱ्या शुभम विनोद कांबळे (वय 26, रा. 263 बुधवार पेठ, सातारा) याच्यावर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्यायदंडाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.

esahas.com

गाडीला ओव्हरटेक केला म्हणून तिघांना बेदम मारहाण

गाडीला ओव्हरटेक केला म्हणून तिघांना दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना यवतेश्वर गावच्या हद्दीत घडली आहे. ही घटना दिनांक 20 जून रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान घडली. याप्रकरणी शुभम दिलीप गायकवाड यांनी फिर्याद दिली असून ओंकार नलवडे शुभम पवार आणि इतर अनोळखी तीन मुलांवर शाहुपुरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

esahas.com

विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com

पोकलँड मशीनला दुचाकीची धडक; खटावच्या युवकाचा जागीच मृत्यू

पुसेगाव-खटाव राज्य महामार्गावरील पुसेगाव हद्दीतील पुलाच्या कामासाठी उभ्या असलेल्या पोकलँड मशीन ला दुचाकीची धडक बसून खटाव येथील युवकाचा जागीच मृत्यू झाला. महेश दशरथ चव्हाण (वय 29) असे या मृत तरुणाचे नाव आहे, तर कपिल राजेंद्र गुंजवटे हे जखमी झाले असून त्यांच्यावर सातारा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत