व्हिडीओ कॉल केल्यानंतर ते रेकॉर्ड करुन शाहूपुरीतील एकाची 1 लाख 80 हजार 440 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 19 जून 2022 रोजी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सातारा : व्हिडीओ कॉल केल्यानंतर ते रेकॉर्ड करुन शाहूपुरीतील एकाची 1 लाख 80 हजार 440 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 19 जून 2022 रोजी घडली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारदार हे 45 वर्षीय पुरुष असून अज्ञाताने त्यांना व्हॉट्सअपवर केला. कॉलिंग झाल्यानंतर ते अज्ञात संशयिताने व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. ते रेकॉर्डिंग केलेले व्हिडीओ तक्रारदार यांना पाठवून ब्लॅकमेल करत पैशांची मागणी केली. पैसे दिल्यास व्हिडीओ डिलीट करेन असे संशयिताने सांगितले. त्यानुसार तक्रारदार यांनी ऑनलाईन पैसे पाठवले. मात्र संशयिताने व्हिडीओ डिलीट न करता पुन्हा पैशांची मागणी करत एकूण 1 लाख 80 हजार रुपये घेतले. तरीही संशयित त्रास देत असल्याने अखेर तक्रारदार यांनी घडलेली घटना पोलिसांना सांगितली. त्यानुसार पोलिसांनी फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.


