महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि.१९ जून रोजी जरंडेश्वर नाका येथील शेतामध्ये अशोक वसंत भोजने, वय ४७, रा. करंजे पेठ, सातारा यांनी एका महिलेला हे शेत माझे आहे. असे म्हणत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून तिला मारहाण केल्याची तक्रार शाहुपुरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.


