गाडीला ओव्हरटेक केला म्हणून तिघांना दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना यवतेश्वर गावच्या हद्दीत घडली आहे. ही घटना दिनांक 20 जून रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान घडली. याप्रकरणी शुभम दिलीप गायकवाड यांनी फिर्याद दिली असून ओंकार नलवडे शुभम पवार आणि इतर अनोळखी तीन मुलांवर शाहुपुरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : गाडीला ओव्हरटेक केला म्हणून तिघांना दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना यवतेश्वर गावच्या हद्दीत घडली आहे. ही घटना दिनांक 20 जून रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान घडली. याप्रकरणी शुभम दिलीप गायकवाड यांनी फिर्याद दिली असून ओंकार नलवडे शुभम पवार आणि इतर अनोळखी तीन मुलांवर शाहुपुरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी फिर्यादी शुभम गायकवाड हे गाडीवरून यवतेश्वर घाटातून सातारा कडे येत असताना संशयितांनी गायकवाड यांना गाडीला ओव्हरटेक केला म्हणून दगड हातात घेऊन मारहाण केली. या मारहाणीत गायकवाड जखमी झाले. त्यानंतर झालेल्या भांडणात मध्यस्थी करताना गायकवाड यांचे मित्र मित्र रविराज घोरपडे यांना सुद्धा दांडक्याने मारहाण करण्यात आली. तसेच रविराज यांची चुलत बहीण शुभांगी घोरपडे यांना यावेळी धक्काबुक्की आणि शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणाचा तपास हवालदार देशमाने करत आहे.


