threewerebeatentodeathforovertakingavehicle

esahas.com

गाडीला ओव्हरटेक केला म्हणून तिघांना बेदम मारहाण

गाडीला ओव्हरटेक केला म्हणून तिघांना दांडक्याने बेदम मारहाण केल्याची घटना यवतेश्वर गावच्या हद्दीत घडली आहे. ही घटना दिनांक 20 जून रोजी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान घडली. याप्रकरणी शुभम दिलीप गायकवाड यांनी फिर्याद दिली असून ओंकार नलवडे शुभम पवार आणि इतर अनोळखी तीन मुलांवर शाहुपुरी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.