शिवछत्रपती ट्रस्ट, जिजाऊ प्रतिष्ठान महाराष्ट्र, हॅप्पी लाईफ फाउंडेशन सातारा आणि अखिल भारतीय योग शिक्षक महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने कला वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या सूर्यनमस्कार स्पर्धेला सातारा शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील मूळ गावी दरे तांब (ता. महाबळेश्वर) येथे वाई पोलीस उपअधीक्षक कार्यालयाकडून नियमित पोलीस बंदोबस्त असल्याचे उपअधीक्षक डॉ शीतल जानवे-खराडे यांनी सांगितले.
शहीद जवान सुरज शेळके यांच्या पार्थिवावर खटाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
अति मद्य प्राशन केल्याने येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
आपल्या ताब्यात असलेल्या दुचाकीचा मालकी हक्क सिद्ध न केल्याने कार्वे, ता. कराड येथील एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
साताऱ्यातून दोन दुचाकींच्या चोरी झाल्याच्या तक्रारी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
जबरी चोरी करून एकाला मारहाण करत त्याच्याकडून मोबाइल व रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेत त्याची दुचाकी कॅनॉलमध्ये टाकून दिल्याची घटना येथील जुन्या औद्योगिक वसाहतीमध्ये घडली. याप्रकरणी अनोळखी तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पुणे-बेंगलोर महामार्गावर लिंब तालुका सातारा गावच्या हद्दीत असणाऱ्या पेट्रोल पंपाच्या पाठीमागे पत्र्याच्या खोल्यात सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर सातारा तालुका पोलिसांनी धाड मारून कारवाई केली. याप्रकरणी शैलेंद्र शशी नायर राहणार केरळ सध्या राहणार लिंब तालुका सातारा याला अटक करण्यात आली असून वेश्याव्यवसाय व्यवसायातून मिळणाऱ्या कमिशनवर आपली उपजीविका करत असल्याची माहिती आहे.
सत्ता आणि पदे मिळूनही शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या शंभूराज देसाई यांच्या विरोधात त्यांच्याच कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला विश्वासाने मंत्रिपद दिले, त्यांच्याकडे बोट दाखवता आणि तुम्ही काय करता ? मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून अडीच वर्षात किती वेळा तोंड दाखवले ? असे उघड सवाल मतदारांकडून त्यांना केले जात आहेत.
श्री सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने शनिवार २ जुलै ते सोमवार ११ जुलै दरम्यान आषाढी पायी पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांची मुक्काम, अल्पोपहार, जेवण, आरोग्यसेवा तसेच औषधपाण्याची मोफत सोय करण्यात आली आहे.