पुणे-बेंगलोर महामार्गावर लिंब तालुका सातारा गावच्या हद्दीत असणाऱ्या पेट्रोल पंपाच्या पाठीमागे पत्र्याच्या खोल्यात सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर सातारा तालुका पोलिसांनी धाड मारून कारवाई केली. याप्रकरणी शैलेंद्र शशी नायर राहणार केरळ सध्या राहणार लिंब तालुका सातारा याला अटक करण्यात आली असून वेश्याव्यवसाय व्यवसायातून मिळणाऱ्या कमिशनवर आपली उपजीविका करत असल्याची माहिती आहे.
सातारा : पुणे-बेंगलोर महामार्गावर लिंब तालुका सातारा गावच्या हद्दीत असणाऱ्या पेट्रोल पंपाच्या पाठीमागे पत्र्याच्या खोल्यात सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर सातारा तालुका पोलिसांनी धाड मारून कारवाई केली. याप्रकरणी शैलेंद्र शशी नायर राहणार केरळ सध्या राहणार लिंब तालुका सातारा याला अटक करण्यात आली असून वेश्याव्यवसाय व्यवसायातून मिळणाऱ्या कमिशनवर आपली उपजीविका करत असल्याची माहिती आहे.
सातारा तालुका पोलिसांना या संदर्भात गोपनीय बातमीदाराकडून ही माहिती मिळाली होती. पोलिसांनी सदर ठिकाणी एक बोगस पंटर पाठवून या बातमीची खात्री केली. नंतर शुक्रवारी सायंकाळी सात वाजता या पत्र्याच्या शेडमध्ये छापा मारला. त्यावेळी येथे भाड्याने राहत असलेला इसम शैलेंद्र नायर याने बाहेरील राज्यातून तीन महिलांना वेश्या व्यवसाय करता परावृत्त करून तेथे आणले होते. या महिलांमध्ये एक अल्पवयीन मुलीसह तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. यासंदर्भात कलम 370, 366 व अधिनियम कलम 345 प्रमाणे बालकांचे लैंगिक संरक्षण अधिनियम 2012 कलम 16 व17 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी, शीतल जाधव, सहायक फौजदार सतीश वंजारी, सुहास पवार, मालोजी चव्हाण, धीरज कुंभार, किरण जगताप, रमेश शिखरे, विश्वनाथ अमराळे, सीमा भुजबळ यांनी सहभाग घेतला.