policecrackdownonprostitutioninlimbarea

esahas.com

लिंब परिसरातील वेश्या व्यवसायावर पोलिसांची कारवाई

पुणे-बेंगलोर महामार्गावर लिंब तालुका सातारा गावच्या हद्दीत असणाऱ्या पेट्रोल पंपाच्या पाठीमागे  पत्र्याच्या खोल्यात सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर सातारा तालुका पोलिसांनी धाड मारून कारवाई केली. याप्रकरणी शैलेंद्र शशी नायर राहणार केरळ सध्या राहणार लिंब तालुका सातारा याला अटक करण्यात आली असून वेश्याव्यवसाय व्यवसायातून मिळणाऱ्या कमिशनवर आपली उपजीविका करत असल्याची माहिती आहे.