साताऱ्यातून दोन दुचाकींच्या चोरी झाल्याच्या तक्रारी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
सातारा : साताऱ्यातून दोन दुचाकींच्या चोरी झाल्याच्या तक्रारी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २३ जून रोजी ५ ते ६.४५ वाजण्याच्या सुमारास सातारा येथील जिल्हा रुग्णालय परिसरात असणाऱ्या सह्याद्री हौसिंग सोसायटी येथून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी क्रमांक एम. एच. ११ सीडी ४१५१ चोरून नेल्याची तक्रार महेश माधव कांबळे, रा. महागाव, ता. सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
दुसऱ्या घटनेत दि. १० ते ११ जून दरम्यान सातारा येथील अजंठा चौक परिसरात असणाऱ्या आयसीसीआय बँकेसमोर पार्किंग केलेली दुचाकी (नंबर समजू शकला नाही) अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार विजय संजय कदम, रा. दत्तनगर यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.


