maharashtra

मालकी हक्क सिद्ध न केल्याने एकावर गुन्हा


Offense against one for not proving ownership
आपल्या ताब्यात असलेल्या दुचाकीचा मालकी हक्क सिद्ध न केल्याने कार्वे, ता. कराड येथील एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : आपल्या ताब्यात असलेल्या दुचाकीचा मालकी हक्क सिद्ध न केल्याने कार्वे, ता. कराड येथील एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ३ मार्च २०२२ रोजी ११.३० वाजण्याच्या सुमारास सातारा येथील रविवार पेठ परिसरात सुदर्शन बबन पवार, रा. कार्वे, ता. कराड याच्या ताब्यात असलेल्या दुचाकीबाबत तो कोणतीही समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्याच्याकडे कागदपत्रांची मागणी केली असता ती त्याने सादर न करता दुचाकीवर मालकी हक्क सिद्ध न केल्याने पो. ना. सुजित नाईक यांनी त्यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.