maharashtra

जबरी चोरी करून एकाला मारहाण ; अज्ञात तिघांवर गुन्हा


Beating one by robbery; Crime on three unknown
जबरी चोरी करून एकाला मारहाण करत त्याच्याकडून मोबाइल व रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेत त्याची दुचाकी कॅनॉलमध्ये टाकून दिल्याची घटना येथील जुन्या औद्योगिक वसाहतीमध्ये घडली. याप्रकरणी अनोळखी तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सातारा : जबरी चोरी करून एकाला मारहाण करत त्याच्याकडून मोबाइल व रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेत त्याची दुचाकी कॅनॉलमध्ये टाकून दिल्याची घटना येथील जुन्या औद्योगिक वसाहतीमध्ये घडली. याप्रकरणी अनोळखी तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.  २३ जून रोजी ५ ते ५.३० वाजण्याच्या सुमारास सातारा येथील जुन्या औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या महाराष्ट्र स्कूटर्स या कंपनीच्या गेटसमोर अमोल बाळकृष्ण जगताप, रा. गोळीबार मैदान परिसर, कोडोली, ता. सातारा यांच्याकडून अज्ञात तीन अनोळखी इस्मानी १५ हजार रुपये किमतीचा मोबाइल व १५० रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेत त्यांना मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी त्यांची दुचाकी कॅनॉलमध्ये टाकून दिल्याची तक्रार  सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. अज्ञात तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल झाला आहे.