Satara

esahas.com

न्यायालय पद भरतीसाठी तत्वतः मान्यता : मदन भोसले

वाई येथे स्वतंत्र अतिरिक्त जिल्हा व सत्र दिवाणी न्यायालयास उच्च न्यायालयाने मंजुरी दिली असून वाई येथे हे न्यायालय प्रत्यक्ष सुरू होण्यासाठी पद भरतीसाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा विधी मंत्री यांनी तत्वतः मान्यता दिली असून लवकरच याबाबतचा निर्णय जाहीर होईल, अशी माहिती माजी आमदार मदन भोसले यांनी दिली.

esahas.com

फिल्म मेकर अरीश मुजावर zeff प्लस इंटरटेनमेंट अवॉर्डने सन्मानित

कुडाळ, तालुका जावळी येथील युवा लघु चित्रपट निर्माते दिग्दर्शक अरीश इम्तियाज मुजावर यांना zeff प्लस इंटरटेनमेंटच्या तर्फे आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये आर. जे. केराबाई ही डॉक्युमेंटरी नामांकित होऊन हरीश मुजावर यांना आज पुणे येथे गौरविण्यात आले.

esahas.com

कोणत्या फळासोबत काय खावं आणि काय टाळावं? फळं अंगी लागावी असं वाटत असेल तर लक्षात ठेवा हे नियम

फळांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन्स, ॲण्टीऑक्सिडंट्स आणि पोषणमुल्ये असतात. त्यामुळे दररोज एक तरी फळ खायलाच पाहिजे, असं आहारतज्ज्ञ सांगतात. त्यानुसार काही जण नियमित फळं खातातही. पण त्याचा पुरेसा लाभ शरीराला मिळत नाहीये असं काही जणांचं म्हणणं असतं. आयुर्वेदातही असं सांगितलेलं आहे की आपण जे काही खातो, ते आपल्या अंगी तेव्हाच लागतं, जेव्हा आपण खाण्यापिण्याचे काही नियम पाळतो (Food items that should be eaten together). कोणत्या पदार्थासोबत काय खावं आणि काय टाळावं, याचेही काही नियम आहेत. असेच काही नियम फळांच्या बाबतीतही आहेतम्हणूनच या लेखामध्ये आपण कोणते फळ किंवा भाजी कशासोबत खावी, जेणेकरून त्या पदार्थाचे पुरेपूर लाभ आपल्या शरीराला मिळतील, याविषयी जाणून घेणार आहोत. ही सर्व माहिती इन्स्टाग्रामच्या healthylyfff या पेजवर शेअर करण्यात आली आहे. यात सांगितलेल्या खाद्यपदार्थांच्या जोड्या एकमेकांसाठी पुरक असून त्यांचं कॉम्बिनेशन शरीरासाठी अतिशय पोषक असतं, असं यात सांगण्यात आलं आहे.

esahas.com

रंगकाम करणाऱ्याचा पाय घसरून पडल्याने मृत्यू

धोम कॉलनी येथे बंगल्याचे रंगकाम करत असताना शिडीवरून पाय घसरून पडल्याने प्रकाश नारायण दुर्गावळे (रा कुसगाव) यांचा मृत्यू झाला.

esahas.com

अल्पवयीन मुलीचे अपहरण

अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

सातारा शहर परिसरात तीन लाखांची जबरी चोरी

सातारा शहर परिसरात तीन लाखांच्या जबरी चोरी प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

esahas.com

सातारा शहरासह जिल्ह्यातील पाचजण बेपत्ता

सातारा शहरासह जिल्ह्यातील पाचजण बेपत्ता झाल्याच्या घटना संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.

esahas.com

ST च्या तिजोरीत ११ कोटी...!!

यंदा कोरोनाचे संकट मावळल्याने गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी गावी जाण्यासाठी एसटीला गर्दी केली होती. या परिवहन विभागानेही प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बसचे योग्यरीत्या संचलन केले होते. त्यामुळे सातारा एसटी विभागाच्या तिजोरीत यंदा गणेशोत्सवाच्या काळात ११ कोटी २९ लाख ८० हजारांची भर पडली.

esahas.com

बारामती, फलटणकरांची घराणेशाही ओक्केच !

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारमुळे देशात आमूलाग्र बदल होवून अर्थव्यवस्था मजबूत होत आहे. सर्वच पातळ्यांवर देशाची प्रगती होत आहे. भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही. मात्र कॉंग्रेससह राज्यातील राष्ट्रवादीच्या बारामती आणि फलटणकरांची घराणेशाही मात्र एकदम ओक्केच असल्याचा टोला भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी लगावला.

esahas.com

राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात महाराष्ट्राला प्रथमच सुवर्णपदक

राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात परखंदी (ता वाई) हायस्कूलचा विद्यार्थी यश ज्ञानेश्वर शिंदे व मार्गदर्शक विज्ञान शिक्षक तथा मुख्याध्यापक प्रसाद यादव यांनी तयार केलेल्या मल्टीपर्पज केटरिंग मशीन या उपकरणाला राष्ट्रीय सुवर्णपदक मिळाले आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्राचा प्रथमच गौरव झाला आहे