महिलेचा विनयभंग तसेच जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
जुन्या भांडणाच्या रागातून एकास मारहाण झाल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
आनेवाडी गावच्या हद्दीतील एका घरातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे वीस हजारांची चोरी केली आहे.
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी झाल्याच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
बेकायदेशीर गावठी पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत तीन गावठी पिस्टल आणि तीन जिवंत राऊंड असा 2 लाख 5 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सातारा शहरातील वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. या उपायोजनांचा भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नोटिशीनंतर येथील पारंगे चौकातील टपरी चालकांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले. यामुळे पारंगे चौकाकडून एसटी स्टँड आणि वाढे फाट्याच्या दिशेने जाणारा रस्ता आता मोठा झाला आहे.
अपघाताचे प्रमाण कमी व्हावे यासाठी ऊस वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी असे स्पष्ट आदेश सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत.
नवा समृद्ध पर्यावरण संतुलित समाज निर्माण करू पाहणार्या लढ्यातील एक नेतृत्व असलेले डॉ भारत पाटणकर यांची पुणे येथे होणार्या 14 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहिती संमेलनाच्या संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
मौजे सासकल येथे मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जन्मदिनानिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित फलटण एज्युकेशन सोसायटी चे फलटण कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवीचे शिवशंकर माध्यमिक विद्यालय सासकल येथे 'राष्ट्रीय शिक्षण दिन' साजरा करण्यात आला.
महिलेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.