maharashtra

रोख रकमेसह साहित्याची चोरी


आनेवाडी गावच्या हद्दीतील एका घरातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे वीस हजारांची चोरी केली आहे.

सातारा : आनेवाडी गावच्या हद्दीतील एका घरातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे वीस हजारांची चोरी केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 नोव्हेंबरच्या दुपारी एक ते 9 नोव्हेंबरच्या दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान आनेवाडी तालुका जावली येथील रवींद्र महादेव फरांदे वय 48 यांच्या राहत्या घराच्या दोन्ही दरवाजांची कुलपे अज्ञात चोरट्यांनी कशाने तरी तोडून घरातील साहित्य व रोख रक्कम असे मिळून वीस हजार रुपये मुद्देमालाची चोरी केली आहे. या घटनेची नोंद तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस नाईक टकले अधिक तपास करीत आहेत.