मौजे सासकल येथे मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जन्मदिनानिमित्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित फलटण एज्युकेशन सोसायटी चे फलटण कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवीचे शिवशंकर माध्यमिक विद्यालय सासकल येथे 'राष्ट्रीय शिक्षण दिन' साजरा करण्यात आला.
महिलेचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असणाऱ्या जुगार अड्डयांवर पोलिसांनी छापे टाकून ५ हजार ६७० रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या.
करंडी, ता. सातारा येथे बंधाऱ्यामध्ये पडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
जकातवाडी गावच्या हद्दीत फोन्टशीरसर, ता. माळशिरस येथील युवकाचा जकातवाडी गावच्या हद्दीत मृत्यू झाल्याची नोंद तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकीय खेळीमध्ये उध्दव ठाकरे फसल्याने त्यांच्यावर सत्ता गमाविण्याची वेळ आली. ठाकरे आता सर्व त्यांच्या प्रमाणेच विचार करत असल्याची जोरदार टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
शिवप्रताप दिन शासकीय पातळीवर सुरू झाला हे सुद्धा एक प्रकारचे अभिनंदन यश आहे अशी कृतज्ञ भावना विश्व हिंदू परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत अवधूत उर्फ बाबूजी नाटेकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
ठाकरे हे बोल घेवडे आहेत, त्यांच्यावर कोणी जादू केली हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. पवारांच्या जो नादाला लागतो तो सहजासहजी सुटत नाही. त्यामुळे बारामतीत राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पाडण्याचा आमचा प्रयत्न आहे, असा जोरदार टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत लगावला.
प्रतापगडावरील अफजल खानाची कबर पर्यटकांसाठी खुली करा. भावी पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास कळला पाहिजे. मुस्लिम समाजाने गैरसमज करून घेऊ नये. या गोष्टीला राजकीय स्वरूप देणं उचित नाही.अतिक्रमण काढून जे केलं ते योग्यच केलं असल्याचे सांगत उदयनराजे भोसले यांनी सरकारला कबर खुली करण्याचे आवाहन केलं आहे.