अफजलखान व सय्यद बंडाच्या कबरीवरील सर्व बांधकाम व भिंतीही नष्ट करण्यात आल्या. आता पुरातन काळात जशी अफजल खान आणि सय्यद बंडाची कबर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्यावर बनवली गेली होती, त्याच पद्धतीची कबर दिसत आहे. त्यामुळे सध्या हा परिसर अतिक्रमणमुक्त दिसत आहे.
मलवडी, ता. माण गावच्या हद्दीत पोलिसांनी जुगार अड्डयावर छापा टाकून मलवडी गावच्या हद्दीत जुगार अड्डयावर छापा टाकून ३ लाख ३० हजार रुपये रोख रक्कम हस्तगत करत जुगाराच्या साहित्यासह मोबाइल, दुचाकी जप्त केल्या.
पाटखळ माथा, ता. सातारा येथे जुगार अड्डयावर छापा टाकून ७८० रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला मारहाण केल्याची घटना लिंब, ता. सातारा येथे घडली.
येथील सदर बझार परिसरात असणाऱ्या लक्ष्मी टेकडी येथे एकाला मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी कोडोली येथील दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
येथील जिल्हा रुग्णालयात तोतया ब्रदर, फार्मासिस्ट म्हणून वावरणाऱ्या संतोष साळुंखे याचे आज सुरक्षारक्षक पृथ्वीराज गायकवाड त्याच्यामुळे बिंग फुटले. जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे याबाबत लेखी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तोतया विरोधात तक्रार देण्याची सूचना पृथ्वीराज गायकवाड याला केली.
ऐतिहासिक सातारा नगरीत छत्रपती शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाच्या खाणाखुणा जतन व्हाव्यात म्हणून उभारण्यात आलेल्या छ. शिवाजी महाराज संग्राहलयास कचरा आणि घाणीने अवकळा प्राप्त झाल्याने माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासनाचा निषेध नोंदवला.
७ नोव्हेंबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळा प्रवेश दिन हा दिवस भारताच्या दृष्टिने नवी पिढी घडवणारा, नवनिर्माणाचे स्वप्न मुलांच्या मन, मेंदू अन् मनगटात सळसळत ठेवणारा दिवस आहे.
सातारा शहर परिसरात असणाऱ्या वाढे फाटा येथील शिवतेज हॉटेल येथे जेवणाच्या बिलाच्या कारणावरून प्राणघातक शस्त्र जवळ बाळगत दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रतापसिह नगर येथील आठ जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.