maharashtra

अफजल खान व सय्‍यद बंडाच्या कबरीवरील अनधिकृत बांधकाम जमीनदोस्‍त


अफजलखान व सय्यद बंडाच्या कबरीवरील सर्व बांधकाम व भिंतीही नष्ट करण्यात आल्‍या. आता पुरातन काळात जशी अफजल खान आणि सय्यद बंडाची कबर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्यावर बनवली गेली होती, त्याच पद्धतीची कबर दिसत आहे. त्‍यामुळे सध्या हा परिसर अतिक्रमणमुक्‍त दिसत आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यातील किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असणारी संपूर्ण जगात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष असणाऱ्या अफजल खान व सय्यद बंडा यांच्या कबरीच्या अवतीभवती अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. हे सर्व अनाधिकृत बांधकाम जिल्हा प्रशासनाने जमीनदोस्त केले. यानंतर अफजलखान व सय्यद बंडाच्या कबरीवरील सर्व बांधकाम व भिंतीही नष्ट करण्यात आल्‍या. आता पुरातन काळात जशी अफजल खान आणि सय्यद बंडाची कबर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्यावर बनवली गेली होती, त्याच पद्धतीची कबर दिसत आहे. त्‍यामुळे सध्या हा परिसर अतिक्रमणमुक्‍त दिसत आहे.
कधी काळ अफजलखान सय्यद बंडाच्या कबरीचे उदातीकरण झाल्यानंतर या ठिकाणी या कबरीला दर्ग्याचे स्वरूप देण्यात आले होते. या कबरीच्या अवतीभवती मोठ मोठाले धार्मिक कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणात केले जात होते. मात्र स्वराज्यावर चाल करून आलेला स्वराज्याचा शत्रू अफजलखान व सय्यद बंडा याच्या कबरीचे उदात्‍तीकरण करून त्याला धार्मिक स्वरूप देण्याच्या प्रयत्नावर न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. हिंदू एकता समितीने व विविध हिंदुत्ववादी संघटनांनी हे उदातीकरण रोखावे अशी मागणी देखील केली होती. गेल्‍या वीस वर्षानंतर सर्व कबरीच्या अवतीभोवतीचे व कबरीवरील सर्व उदात्‍तीकरणासाठी बांधले गेलेले बांधकाम प्रशासनाने जमीनदोस्त केले. यानंतर उघडी छताड पडलेली अफजलखान व सय्यद बंडाची ही कबर खुल्या आसमानात दिसत आहेत. प्रशासनाने या कबरीच्या अवतीभवती हिरवे कापड संरक्षक भिंत म्हणून लपेटले आहे.