सातारा शहर परिसरात असणाऱ्या वाढे फाटा येथील शिवतेज हॉटेल येथे जेवणाच्या बिलाच्या कारणावरून प्राणघातक शस्त्र जवळ बाळगत दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रतापसिह नगर येथील आठ जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : सातारा शहर परिसरात असणाऱ्या वाढे फाटा येथील शिवतेज हॉटेल येथे जेवणाच्या बिलाच्या कारणावरून प्राणघातक शस्त्र जवळ बाळगत दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रतापसिह नगर येथील आठ जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि.६ नोव्हेंबर रोजी ११.३० वाजण्याच्या सुमारास शिवतेज हॉटेल येथे आकाश दत्तात्रय जाधव, सुनील वाघमारे, रोहित वाघमारे, अजय खवळे, आप्पा भवाळ, अमर भवाळ, शुभम कांबळे सर्व राहणार प्रतापसिंह नगर यांनी प्राणघातक शस्त्र जवळ बाळगत जेवणाच्या बिलाच्या कारणावरून झालेल्या वादामुळे हॉटेल मालक अमोल नलावडे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. तसेच कॅश काऊंटर व खिडकीची काच फोडून दहशत वाढवण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहे.


