maharashtra

करंडी येथे बंधाऱ्यात पडून एकाचा मृत्यू


करंडी, ता. सातारा येथे बंधाऱ्यामध्ये पडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : करंडी, ता. सातारा येथे बंधाऱ्यामध्ये पडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १० रोजी १०.४५ वजनाच्या सुमारास करंडी गावच्या हद्दीत कुंभार वगळ नावाच्या शिवारात असलेल्या पाण्याच्या बंधाऱ्यांमध्ये तेथीलच भानुदास यादवराव जाधव, वय ७५ त्यांचा पाण्यात पडून बुडून मृत्यू झाल्याची खबर सुरज संजय जाधव यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिली.