सिव्हिल हॉस्पिटल च्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
सातारा : सिव्हिल हॉस्पिटल च्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंग मध्ये पार्क केलेली प्रीतम संपत बर्गे वय ४२, रा. चिंचणेर निंब, ता. सातारा यांची वीस हजार रुपये किमतीची बजाज डिस्कवर दुचाकी क्रमांक एमएच 11 एझेड 4547 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून अधिक तपास महिला पोलीस नाईक पवार करीत आहेत.