maharashtra

बेदरकारपणे दुचाकी चालवल्याप्रकरणी एकावर गुन्हा


बेदरकारपणे दुचाकी चालवल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : बेदरकारपणे दुचाकी चालवल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास पोवई नाका ते एसटी स्टँड जाणाऱ्या रस्त्यावर प्रवीण जगन्नाथ खरटमल वय 40, रा. सैदापूर, ता. सातारा हे त्यांच्या ताब्यातील बजाज डिस्कवर हे वाहन क्रमांक एम एच 11 बीसी 0214 वेडेवाकडे, बेदरकारपणे, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवत असल्याचे आढळून आले. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस हवालदार साठे अधिक तपास करीत आहेत.