Satara

esahas.com

ग्रेड सेपरेटरमध्ये दोन दुचाकींचा अपघात; दोनजण जखमी

पोवईनाका येथील ग्रेड सेपरेटरमध्ये दोन दुचाकींचा अपघात झाला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत.

esahas.com

हळद खरेदी करणाऱ्या सांगलीच्या व्यापाऱ्याला सातारा पोलिसांकडून अटक

सातारा जिल्ह्यातील 26 शेतकऱ्यांकडून 44 लाख 87 हजार रुपयांची हळद खरेदी करून त्याची रक्कम न देणाऱ्या राजकुमार सारडा वय 50 राहणार विश्रामबाग सांगली याला सातारा तालुका पोलिसांनी गुरुवारी अटक केली. तालुका पोलिसांच्या पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून सारडा याला ताब्यात घेतले आहे.

esahas.com

देऊर सोसायटी अपहार प्रकरणातील आरोपीस अटक

देऊर विकास सेवा सोसायटी देऊर तालुका कोरेगाव येथे दोन कोटी 16 लाख 15 हजार 187 रुपयांच्या अपहार प्रकरणी चेअरमन संचालक व सचिव अशा एकूण 36 जणांवर आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तीन वर्षापासून फरार असणारा आरोपी विजय शांताराम कोकणे राहणार देऊर तालुका कोरेगाव याला सीआरपीसी कायदा कलम 82 प्रमाणे अटक करण्यात आली आहे.

esahas.com

दोन वर्षांपूर्वी चोरी केलेली मोटरसायकल स्थानिक गुन्हे शाखेकडून हस्तगत; आरोपीस अटक

दोन वर्षांपूर्वी मोटरसायकल चोरलेल्या पोलिस अभिलेखावरील सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने संगमनगर परिसरातून अटक केली आहे. रमेश अशोक बिराजदार व 21 राहणार संगमनगर कॅनॉल याला पोलिसांनी पल्सर मोटार सायकलसह ताब्यात घेतले आहे.

esahas.com

बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वि. दा. सावरकर यांच्याबद्दल जे उदगार काढले आहेत. त्याचा गुरुवारी बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी निषेध केला. पोवई नाका येथे राहुल गांधी यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

esahas.com

सरकारी नोकरांची पतपेढीवर आदर्श भागधारक पॅनलचे निर्विवाद वर्चस्व

सातारा जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी मर्यादित सातारा या संस्थेच्या संचालक मंडळाची सन २०२२-२३ ते २०२७-२८ या 'कालावधीसाठीची निवडणूक पार पडली. त्यामध्ये महसूल, न्याय, आरोग्य, कोषागार तसेच अन्य शासकीय कर्मचा-यांच्या सर्व समावेशक आदर्श भागधारक पॅनलने दणदणीत यश मिळवत संपुर्ण १५ संचालक प्रचंड मतांनी निवडून आले व विरोधी परिवर्तन पॅनलचा संपुर्ण धुव्वा उडविला.

esahas.com

जांभळेघर वस्तीचा रस्ता गेला चोरीला : जिल्हा शिवसेनाप्रमुख सचिन मोहिते

रोहोट ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या जांभळेघर वस्ती ते घाटाई या दरम्यानचा अडीच किलोमीटर चा रस्ता ठेकेदाराने डांबरीकरण आणि खडीकरण न करताच त्याचे परस्पर अकरा लाख रुपयांचे बिल काढल्याचा धक्कादायक आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

esahas.com

साताऱ्यात महा विकास आघाडीचे पॅनेल दीपक पवार यांच्या नेतृत्वाखाली

पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे नगरपालिकेला पॅनल उभे करणार, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. आज पुणे येथील बारामती हॉस्टेल येथे दीपक पवार यांच्यासोबत बैठक पार पडली.

esahas.com

चोंबडे सल्ले देण्याचा नवीन व्यवसाय आमदारांनी सुरू करावा

ज्यांना जनतेने नगरपरिषदेसाठी रिटायर केले आहे त्यांनी सातारा विकास आघाडीने रिटायरमेंट घ्यावी, असा सल्ला देणे म्हणजे चोंबडेपणा आहे. आमदारांचा रियल इस्टेटचा धंदा कमी झाला असल्यास त्यांनी चोंबडे सल्ले देण्याचा नवीन व्यवसाय सुरू करावा, असे जोरदार प्रत्युत्तर खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे दिले आहे.

esahas.com

विकास सेवा संस्थांनी ग्राहकांना गुणात्मक व तत्पर सेवा देणे काळाजी गरज : बाळासाहेब पाटील

आ. बाळासाहेब पाटील म्हणाले, बँकेने सहकारी बँकिंग क्षेत्रात देशामध्ये नावलौकिक मिळविलेला असून प्रगत बँक म्हणून सहकारीतील इतर बँका व विविध संस्था पाहत आहेत. बँकेच्या विकासात या तालुक्याचे योगदान मोठे आहे.