सातारा जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी मर्यादित सातारा या संस्थेच्या संचालक मंडळाची सन २०२२-२३ ते २०२७-२८ या 'कालावधीसाठीची निवडणूक पार पडली. त्यामध्ये महसूल, न्याय, आरोग्य, कोषागार तसेच अन्य शासकीय कर्मचा-यांच्या सर्व समावेशक आदर्श भागधारक पॅनलने दणदणीत यश मिळवत संपुर्ण १५ संचालक प्रचंड मतांनी निवडून आले व विरोधी परिवर्तन पॅनलचा संपुर्ण धुव्वा उडविला.
सातारा : सातारा जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी मर्यादित सातारा या संस्थेच्या संचालक मंडळाची सन २०२२-२३ ते २०२७-२८ या 'कालावधीसाठीची निवडणूक पार पडली. त्यामध्ये महसूल, न्याय, आरोग्य, कोषागार तसेच अन्य शासकीय कर्मचा-यांच्या सर्व समावेशक आदर्श भागधारक पॅनलने दणदणीत यश मिळवत संपुर्ण १५ संचालक प्रचंड मतांनी निवडून आले व विरोधी परिवर्तन पॅनलचा संपुर्ण धुव्वा उडविला.
विरोधकांनी संस्थेच्या सभासदांना दिशाभूल करणारी अनेक आश्वासने दिली होती. तरी संस्थेच्या सभासदांनी सर्व खात्यांचा समावेश असलेल्या आदर्श भागधारक पॅनेलच्या सुसंस्कृत, चांगल्या विचारांची कास असलेल्या, संस्थेला सहकार कायदयान्वये चालविणा-या जुन्या जाणकार तसेच नविन तडफदार उमेदवारांना प्रथम पसंतीची मोहोर उमटवून सर्वांना प्रचंड मतांनी निवडून आणले.
आदर्श भागधारक पॅनेलला निवडून आणणेमध्ये प्रामुख्याने आरोग्य खातेच्या श्रीम. सुरेखा चव्हाण, विठ्ठल भोईटे, राहूल जगताप, महसूल खात्यातील महेश उबारे जयंत वीर, न्याय खात्यातील भरत यादव, कोषागार खात्यातील पांडुरंग भोसले यांनी प्रचंड कष्ट घेतले. आदर्श भागधारक पॅनलचे उमेदवार चंद्रकांत कांबिरे, सागर कारंडे, संदीप गार्ड, सुरेश जाधव, विक्रम शिंदे, दत्तात्रय खंडागळे, विनायक पाटील, संजय बैलकर, नितीन मोहिते, विक्रमसिंह मोहिते, सुनिल सावंत, नितीन क्षीरसागर, सुरेश जाधव हे प्रचंड बहुमताने निवडून आले. तसेच आर्दश भागधारक पॅनेलच्या महिला उमेदवारांमध्ये न्याय खात्याच्या सौ.सुनिता रेडेकर, आरोग्य खात्याच्या सौ.संगिता कणसे व कोषागार खात्याचे दिलीप जानकर हे यापुर्वीच बिनविरोध निवडून आलेले आहेत.
आदर्श भागधारक पॅनलच्या निवडून आलेल्या सर्व उमेदवारांनी संस्थेच्या सर्व सभासदांचे हार्दिक आभार मानले.


