दोन वर्षांपूर्वी मोटरसायकल चोरलेल्या पोलिस अभिलेखावरील सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने संगमनगर परिसरातून अटक केली आहे. रमेश अशोक बिराजदार व 21 राहणार संगमनगर कॅनॉल याला पोलिसांनी पल्सर मोटार सायकलसह ताब्यात घेतले आहे.
सातारा : दोन वर्षांपूर्वी मोटरसायकल चोरलेल्या पोलिस अभिलेखावरील सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने संगमनगर परिसरातून अटक केली आहे. रमेश अशोक बिराजदार व 21 राहणार संगमनगर कॅनॉल याला पोलिसांनी पल्सर मोटार सायकलसह ताब्यात घेतले आहे.
दिनांक 17 नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना पोलीस अभिलेखा वरील गुन्हेगार बिराजदार हा संगमनगर परिसरात पल्सर मोटार सायकल सह वावरत असल्याची माहिती मिळाली. ही मोटर सायकल त्याने दोन वर्षांपूर्वी याच परिसरातून चोरली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, रमेश गर्जे यांच्या पथकाने बिराजदार याला पल्सर मोटरसायकल सह ताब्यात घेतले आहे.
या कारवाईत लक्ष्मण जगधने, शरद बेबले, प्रवीण फडतरे, गणेश कापरे, मोहन पवार, रोहित निकम, सचिन ससाळ, पृथ्वीराज जाधव, वैभव सावंत यांनी सहभाग घेतला.


