maharashtra

देऊर सोसायटी अपहार प्रकरणातील आरोपीस अटक


देऊर विकास सेवा सोसायटी देऊर तालुका कोरेगाव येथे दोन कोटी 16 लाख 15 हजार 187 रुपयांच्या अपहार प्रकरणी चेअरमन संचालक व सचिव अशा एकूण 36 जणांवर आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तीन वर्षापासून फरार असणारा आरोपी विजय शांताराम कोकणे राहणार देऊर तालुका कोरेगाव याला सीआरपीसी कायदा कलम 82 प्रमाणे अटक करण्यात आली आहे.

सातारा : देऊर विकास सेवा सोसायटी देऊर तालुका कोरेगाव येथे दोन कोटी 16 लाख 15 हजार 187 रुपयांच्या अपहार प्रकरणी चेअरमन संचालक व सचिव अशा एकूण 36 जणांवर आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तीन वर्षापासून फरार असणारा आरोपी विजय शांताराम कोकणे राहणार देऊर तालुका कोरेगाव याला सीआरपीसी कायदा कलम 82 प्रमाणे अटक करण्यात आली आहे.
 आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपाधीक्षक मोहन शिंदे यांच्या निर्देशाप्रमाणे ही कारवाई करण्यात आली. देऊर सेवा सोसायटीमध्ये दोन कोटी सोळा लाखाच्या अपहार प्रकरणी कोकणे याला फरारी घोषित करण्यात आले होते सदरच्या आरोपीस त्याच्या नातेवाईकांनी आसरा देऊन लपण्यास मदत केल्याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. त्यांच्यावर देखील कलम 212 प्रमाणे का कारवाई करू नये या पद्धतीची नोटीस बजावणी झाली होती पोलीस उपनिरीक्षक प्रकाश उमाप आणि त्यांच्या पथकाने कोकणे याला ताब्यात घेतले आहे त्याला न्यायालयात हजर केले असता सहा दिवसाची पोलीस कोठडी मंजूर केली आहे .
तसेच श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था कोळकी याप्रकरणी सुद्धा फलटण शहर पोलीस स्टेशन येथे संबंधित संचालकांविरुद्ध दोन गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणी नऊ आरोपींना अटक आहे. हर्षद मोहनलाल शहा वय 70 राहणार धायरी पुणे हे तीन वर्षापासून या गुन्ह्यांमध्ये आरोपी फरार होते. यांना 17 नोव्हेंबर रोजी तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले यांनी अटक केली. चिंतामणी पतसंस्थेच्या अपहार प्रकरणात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केल्यास त्यांना पाच दिवसाची कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश उमाप, प्रमोद नलावडे, मनोज जाधव, प्रशांत नलावडे, निलेश चव्हाण, संतोष राऊत, शफिक शेख, प्रसाद जाधव यांनी सहभाग घेतला आहे.