maharashtra

ग्रेड सेपरेटरमध्ये दोन दुचाकींचा अपघात; दोनजण जखमी


पोवईनाका येथील ग्रेड सेपरेटरमध्ये दोन दुचाकींचा अपघात झाला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत.

सातारा : पोवईनाका येथील ग्रेड सेपरेटरमध्ये दोन दुचाकींचा अपघात झाला असून दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, बुधवारी सायंकाळी हा अपघात झाला आहे. रफिक बागवान (रा. बाबर कॉलोनी) हे ग्रेड सेपरेटरमधून निघाले होते. यावेळी सुरज धनाजी निपाने (रा. राकुसलेवाडी, आसनगाव ता. सातारा) हे देखील जात असताना दोन्ही वाहनांचा अपघात झाला. अपघातामध्ये दुचाकींचे नुकसान होवून दोघानांही गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर जखमी दोघांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेवून पाहणी केली.