maharashtra

हळद खरेदी करणाऱ्या सांगलीच्या व्यापाऱ्याला सातारा पोलिसांकडून अटक


सातारा जिल्ह्यातील 26 शेतकऱ्यांकडून 44 लाख 87 हजार रुपयांची हळद खरेदी करून त्याची रक्कम न देणाऱ्या राजकुमार सारडा वय 50 राहणार विश्रामबाग सांगली याला सातारा तालुका पोलिसांनी गुरुवारी अटक केली. तालुका पोलिसांच्या पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून सारडा याला ताब्यात घेतले आहे.

सातारा : सातारा जिल्ह्यातील 26 शेतकऱ्यांकडून 44 लाख 87 हजार रुपयांची हळद खरेदी करून त्याची रक्कम न देणाऱ्या राजकुमार सारडा वय 50 राहणार विश्रामबाग सांगली याला सातारा तालुका पोलिसांनी गुरुवारी अटक केली. तालुका पोलिसांच्या पथकाने अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून सारडा याला ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणाची अशी माहिती मर्ढ वडूथ गोवे मालगाव हद्दीतील शेतकऱ्यांची हळद सारडा याने 2018 मध्ये खरेदी केली होती. मात्र त्याचे बिल अदा केले नाही. याप्रकरणी विजय तुकाराम शिंगटे यांनी 29 जुलै 2022 रोजी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या प्रकरणात एकूण 26 शेतकऱ्यांची 44 लाख 87 हजार 330 रुपयाची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले होते. सातारा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या सूचनेप्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पिसाळ, पोलीस उपनिरीक्षक जे जे जाधव, भंडारी, परिहार, सतीश पवार या पथकाने सांगली येथे जाऊन सारडा याला ताब्यात घेतले.
 हा आरोपी पोलिसांना सतत गुंगारा देत होता. मात्र त्याची गोपनीय माहिती काढून त्याला गुरुवारी अटक करण्यात आली. त्याला न्यायालयात हजर केले असता 21 नोव्हेंबर पर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या कारवाईमध्ये सतीश पवार, हवालदार परिहार, आवळे यांनी सहभाग घेतला.