गोरेगाव वांगी, ता. खटाव येथून एक युवती बेपत्ता झाल्याची तक्रार औंध पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा शहराजवळ झालेल्या अपघातात अरुण सीमाराम मोडक (वय 54, रा. स्वामी समर्थ मठ, कल्याण) हे ठार झाले. पहाटे हा अपघात झाला असून या घटनेची नोंद शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
संघटीत गुन्हेगारी अंतर्गत (मोक्का) पोलिसांना पाहिजे असणारा संशयित आरोपी महेश तपासे सातारा जिल्हा न्यायालयात शरण आला आहे. यानंतर न्यायालयाने त्याची रवानगी सातारा कारागृहात (जेल) केली असून लवकर पोलिस ताबा घेण्याची शक्यता आहे.
जुन्या वादातून एकास मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर रहिमतपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
करंजे, ता. सातारा येथून दुचाकीची चोरी झाल्याची तक्रार मेढा पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
शाहूनगर ते मोनार्क हॉटेल, एसटी कॉलनी ते युनायटेड वेस्टर्न बँक कॉलनी या रस्त्याचे पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र ते निकृष्ट दर्जाचे असल्याने पहिल्या पावसातच रस्त्याला चरे पडून खड्डे पडले. या रस्त्याचे पुन्हा एकदा डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी शाहूनगर चे रहिवासी वकील सचिन तिरोडकर यांनी केली आहे.
सातारा शहरातील भंगारवाल्यानी काही लोकप्रतिनिधीच्या बागलबचंच्याना सोबत घेऊन १७ लाख रुपयांना इमारती विकत घेऊन भंगारवाल्यानी दिवसाढवळ्या दरोडा टाकून चोरून नेला आहे. या दरोड्याची कोणत्याही अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नाही.
महाराष्ट्रातील तमाम जनता मराठी भाषिक नागरिकांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे हा महाराष्ट्राच्या एकजुटीचा संदेश देण्याची गरज निर्माण झाली असल्यामुळे सभागृहाचे सर्व कामकाज बाजूने ठेवून त्यावर चर्चा व्हावी, अशी मागणी आ. शशिकांत शिंदे यांनी आज सभागृहात केली.
मांढरदेव येथील काळुबाई मंदिरातील दानपेटीतील रक्कम चोरी व अपहार प्रकरणी निषेध करून, सखोल चौकशीची मागणी करत येथील व्यापारी व ग्रामस्थांनी बंदची हाक दिली होती. मांढरदेव येथे शंभर टक्के बंद पाळण्यात आला.
सातारा शहरातील प्रभाग क्रमांक १७ मधील रस्त्याचे काम व्यवस्थित न झाल्यामुळे त्याला पावसाळ्यात खड्डे पडल्याने अपघात होऊन अनेक जण जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.